Economic Inequality: गरीब, निम्न मध्यमवर्गीय युवकांसाठी आता पतमानांकन (क्रेडिट स्कोअर) हे चारित्र्यप्रमाणपत्राची (कॅरॅक्टर सर्टिफिकेट) जागा घेत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एका युवकाला खराब क्रेडिट रेटिंग म्हणून नोकरी नाकारली. मद्रास उच्च न्यायालयाने तो निर्णय उचलून धरला आहे. यातून एक वाईट पायंडा पडण्याची शक्यता आहे. वित्त भांडवलाचे लॉजिक मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला कवेत घेऊ लागले आहे. तुम्ही कर्जाचा हप्ता चुकवला म्हणजे तुम्ही अप्रामाणिक आहात, तुम्ही बद चारित्र्याचे आहात, असा निष्कर्ष काढणे अत्यंत धोकादायक आहे. .समाजातील तळाशी असलेल्या (बॉटम ऑफ पिरॅमिड) कोट्यवधी नागरिकांना किरकोळ (रिटेल) कर्जे दिली जात आहेत. गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्ड, कन्झ्युमर लोन, गोल्ड लोन, मायक्रो फायनान्स लोन अशी भली मोठी यादी आहे. यातील जास्तीत जास्त पैशांचे व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असतात. तसा कंपन्यांचा आग्रह असतो..Cibil Score : शेतकऱ्यांचा सीबिल स्कोअर कमी का असतो ?.साधारण २००० पासून क्रेडिट स्कोअर कंपन्या सुरू झाल्या. त्यांना रोखीत होणारे व्यवहार पकडणे मुश्कील असते. पण इलेक्ट्रॉनिक मनी ट्रान्स्फरमुळे कोणी कोणाकडून, किती कर्ज घेतले, कधी आणि किती फेडले, वेळेवर फेडले का उशिरा फेडले, की फेडलेच नाही हा डेटा तयार होतो. सर्व कर्जसंस्था आपला डेटा क्रेडिट कंपन्यांना देतात. त्याचा उपयोग करून पतमानांकन कंपन्या प्रत्येक व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर तयार करतात. अगदी ग्रामीण भागातील लोकांमध्येही सीबिल स्कोअर या नावाची दहशत तयार केली गेली..Economic Growth : रहस्य शाश्वत आर्थिक वाढीचे! .आता हा क्रेडिट स्कोअर चारित्र्य प्रमाणपत्राची (कॅरॅक्टर सर्टिफिकेट) जागा घेऊ लागला आहे. घर भाड्याने देणारे, नवीन विमा पॉलिसी देणारे क्रेडिट रेटिंग मागतात इथपर्यंत ठीक. कारण ते शुद्ध वित्तीय व्यवहार आहेत. पण लग्न ठरवतानाही क्रेडिट स्कोअर बघितला जाऊ लागला आहे. यात सगळ्यात खतरनाक आहे ते नोकरी देताना क्रेडिट स्कोअर तपासणे..तरुण शैक्षणिक कर्ज घेतात, क्रेडिट कार्ड वापरतात वगैरे. ते वेळेवर हप्ते (ईएमआय) भरू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे नोकरी नसते, असलेली जाते, कमी पगार मिळतो इत्यादी. ईएमआय थकला की क्रेडिट स्कोअर कमी होतो. जेथे नोकरीसाठी अर्ज करणार, त्या कंपनीने क्रेडिट स्कोअर कमी आहे म्हणून नोकरी नाकारली तर काय होईल? शाळकरी मुलगा देखील सांगेल की तो अजून ईएमआय थकवेल. त्याचा क्रेडिट स्कोअर अजून खराब होईल आणि नोकरी मिळण्याची शक्यता अजून दुरावेल..यात तीन मुद्दे आहेतअगदी रिझर्व्ह बँकेच्या लिखित तत्त्वांप्रमाणे ऐपत असून कर्ज बुडवणे आणि कर्ज फेडण्याची इच्छा असून कर्ज फेडता न येणे (विलफुल डिफॉल्टर आणि जेन्युईन डिफॉल्टर) यात फरक असतो, करावा लागतो. त्याचा फायदा या युवकांना मिळायला नको का?रिटेल / वंचित घटकातून आलेल्या कर्जदाराला ज्या वेळी कर्ज मंजूर केले जाते, त्या वेळी कर्ज अधिकाऱ्याची, त्याच्या वरच्या अधिकाऱ्याचे उत्तरदायित्व निश्चित केले पाहिजे. त्यांनी नक्की काय बघून कर्ज मंजूर केले?.कॉर्पोरेट क्षेत्र किती लाख कोटी डिफॉल्ट करून पुन्हा पुन्हा लाखो कोटी रुपयांचे कर्ज उचलते. या विषयावर लिहून बोलून लोक थकले आहेत.युवकांनो, तुम्ही कोणत्याही जात, धर्म, प्रांताचे असाल, हे तुम्हा सर्वांचे जीवन मरणाचे प्रश्न आहेत. यावर संघटित होऊन कृती करणे गरजेचे आहे.(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.