Jammu-Kashmir Landslide : मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; भूस्खलनमुळे अनेक घरे कोसळली

Jammu-Kashmir Landslide News : जम्मू-काश्मीरमध्ये हवामान विभागाने येत्या २४ तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर येथे मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून भूस्खलनमुळे अनेक घरे कोसळली आहेत.
Jammu-Kashmir Landslide : मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; भूस्खलनमुळे अनेक घरे कोसळली

Pune News : देशाच्या अनेक भागात सध्या उष्णतेची लाट उसळली असून जम्मू-काश्मीरमध्ये मात्र मुसळधार पाऊस बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे हवामान विभागाने येत्या २४ तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासन अलर्टमोडवर आले आहे. यादरम्यान काश्मीरमधील बारामुल्ला, किश्तवार आणि रियासी जिल्ह्यामध्ये भूस्खलनच्या घटना घडल्या असून डझनभर घरांची पडझड झाली आहे. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि भूस्खलनच्या घटनांनी हाहाकार माजवला आहे. येथे तीन डझनहून अधिक घरे कोसळली कोसळली असून भूस्खलनमुळे मार्ग बंद झाले आहेत. मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे सर्वाधिक नुकसान हे बारामुल्ला, किश्तवाड आणि रियासी जिल्ह्यात झाले आहे. सध्या या जिल्ह्यांमध्ये भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. 

Jammu-Kashmir Landslide : मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; भूस्खलनमुळे अनेक घरे कोसळली
Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

किश्तवाडात १२ घरांची पडझड 

किश्तवाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे १२ घरांची पडझड झाली असून अनेक घरे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे येथे प्रशासनाने हाय अलर्ट जारी करताना आपत्ती प्रतिसाद यंत्रणांना तैनात केलं आहे. येथे नागसेनी, मुघल मैदान आणि किश्तवाड भागातील घरांचे नुकसान झाले आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. बर्फवृष्टी देखील होत असून जमीन धसत आहे. यामुळे आपत्ती प्रतिसाद यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावर अर्धा डझन ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पूंछमार्गे काश्मीरला जोडणारा मुघल रस्ता आधीच बंद झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

टायपिंग परीक्षा 

हवामान खात्यानेही दिलेल्या अलर्टनंतर काश्मीरमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्युनियर असिस्टंटची टायपिंग परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच भूस्खलनामुळे बंद असाणारा माहामार्गावर मोकळा होईपर्यंत प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये शाळांना सुट्टी

मंगळवारीही बहुतांश भागात बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे काश्मीरमध्ये मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jammu-Kashmir Landslide : मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; भूस्खलनमुळे अनेक घरे कोसळली
Landslide In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ८८ गावांना भूस्खलनाचा धोका, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सर्वेक्षण

किश्तवाड जिल्ह्यात रेड अलर्ट 

अनेक डोंगराळ आणि दुर्गम भागात रस्ते तुटल्याने आणि दरड कोसळल्याने त्यांचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. किश्तवाड जिल्ह्यात रेड अलर्ट आहे. रियासीच्या डोडा, रामबन आणि गुलाबगडमध्ये नदी-नाल्यांमध्ये चार जण वाहून गेले असून, त्यापैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले यश आले आहे. 

बस खड्ड्यात पडली

पूंछच्या मंडीमध्ये बस खड्ड्यात पडल्याने १२ मुलांसह २२ जण जखमी झाले आहेत. उरी येथील भुजिथाला येथे दरड कोसळल्याने दोन मुलांसह ८ जण जखमी झाले आहेत. तसेच उरीमध्येच एस ब्रिजजवळ दरड कोसळून दोन जण जखमी झाले आहेत.

हिमस्खलनाचा धोका, पाणीपातळीत वाढ  

येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर सततच्या बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे रस्ते बंद पडले आहेत. प्रशासनाशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

यादरम्यान गुलमर्गसह काश्मीरमधील उत्तर आणि मध्य काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा धोका वाढला आहे. सोमवारी (ता. २९) सोनमर्ग येथे हिमस्खलन झाले होते. सुदैवाने यात हा परिसर वनक्षेत्राचे असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून कुपवाडामध्ये पूर आला आहे. येथे आतापर्यंत ३३६ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com