Kolhapur Kharip Crop agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

Monsoon Rain : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा खरिपाचे २ लाख ११ हजार १०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Kharip Season : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा खरिपाचे २ लाख ११ हजार १०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे. मागच्यावर्षीच्या दुष्काळामुळे खरीप हंगामात पेरणी कमी झाली होती परंतु यंदा ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. खरिपाच्या क्षेत्रात वीस हजार हेक्टरने वाढ होईल, असा अंदाज आहे. साधारण मे मध्ये अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात धूळवाफ पेरणीला सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे.

जिल्ह्यात या महिन्यात काही भागात वळीवाचा पाऊस झाला. पावसामुळे जमीन मशागतीसाठी उपयुक्त झाली आहे. जिरायत कोरडवाहू जमिनीवर बांधबंधिस्ती कामाला सुरवात झाली आहे. मे महिन्यात अक्षय तृतीयेपासून धूळवाफ पेरणीला सुरुवात होईल, असे चित्र आहे.

खरिपामध्ये गतवर्षी १ लाख ८७ हजार ५८४ हेक्टर, म्हणजे ९७ टक्के क्षेत्र पेरणी झाली होती. त्यापासून ४ लाख ५९ हजार टन अन्नधान्याचे व गळीत धान्य पिकाचे उत्पादन मिळाले होते. त्यामध्ये प्रामुख्याने भात, नागली, ज्वारी, मका, कडधान्ये, भुईमूग व सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे. यावर्षी १,८८,४०० हेक्टर क्षेत्र ऊस पीक असून एक कोटी ८८ लाख चारशे उसाचे उत्पादन मिळेल, म्हणजे हेक्टरी १०० टन उत्पादक मिळेल असा अंदाज आहे.

बियाणे व रासयनिक खते याचे नियोजन कृषी खात्याने केले आहे. खरीप हंगामासाठी ८५ हजार ३११ टन खत उपलब्ध असून एक लाख ४९ हजार टन खत मंजूर झाले आहे. बियाणामध्ये भाताचे २३९४० क्विंटल मागणी असून ९०० क्विंटल उपलब्ध झाले आहे. ज्वारी ४४, तूर २३, मूग ६२, उडीद ७९, भुईमूग २२५६, मका ६३,नाचणी ४३ ,सोयाबीन ११२६१ क्विंटल मध्ये मागणी असून २५० क्विंटल सोयाबीन उपलब्ध आहे.

कोल्हापूर जिल्हा कृषी अधिक्षक अरूण भिंगारदेवे म्हणाले की, खरीप पिकांचे उद्दिष्ट वाढवून आले आहे. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. खते, बियाणे अधिकृत परवानाधारक दुकानदारांकडून घ्या. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता तपासून पेरणी करावी. खते, बियाणाचे उपलब्धतेचे नियोजन केले असून गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळण्यासाठी भरारी पथके स्थापन केली.

पीकनिहाय क्षेत्र

भात पीक

सर्वसाधारण क्षेत्र १ लाख हेक्टर

गतवर्षी प्रतिहेक्टरी उत्पादन ३,२७६ किलो

चालू वर्षात प्रतिहेक्टरी उद्दिष्ट ३,६६० किलो

नागली पीक

सर्वसाधारण क्षेत्र २० हजार हेक्टर

गतवर्षी प्रतिहेक्टरी उत्पादन २०७९ किलो

चालू वर्षात प्रतिहेक्टरी उद्दिष्ट २१४५ किलो

भुईमूग पीक

सर्वसाधारण क्षेत्र ४०० हेक्टर

गतवर्षी प्रतिहेक्टरी उत्पादकन १,७६० किलो

चालू वर्षात प्रतिहेक्टरी उद्दिष्ट १९५० किलो

सोयाबीन पीक

सर्वसाधारण क्षेत्र ४४ हजार हेक्टर

गतवर्षी प्रतिहेक्टरी उत्पादकता २,०२७ किलो

चालू वर्षात प्रतिहेक्टरी उद्दिष्ट २७४० किलो

बियाणे व रासायनिक खते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT