Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

Lemon Rate : लिंबू, कलिंगडाची मागणी टिकून आहे. फळबाजारात हापूस आंब्याचे दर उतरले आहेत.
Kolhapur Market Rate
Kolhapur Market Rateagrowon
Published on
Updated on

Summer Season : वाढत्या उष्म्यामुळे भाजी मंडईत पालेभाज्या, फळभाज्यांची आवक घटली आहे. कोंथिबीर, पालेभाज्यांचे दर दुपटीने वाढून पेंढीचा दर २० रुपये झाला आहे. हिरवी मिरची, गवार, बिन्स, ढब्बूचे दर तेजीत आहेत. लिंबू, कलिंगडाची मागणी टिकून आहे. फळबाजारात हापूस आंब्याचे दर उतरले आहेत. जनावरांच्या बाजारात बकऱ्यांचे दर मागणीमुळे वधारले आहेत.

महिनाभरापासून वाढलेल्या उष्म्याचा भाजीपाला, फळभाज्या वाढीवर परिणाम झाला आहे. साहजिकच यामुळे आवक मंदावली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. मेथी, पालक, लाल माठ यांची तुरळक आवक असून पेंढीला २० रुपये असा दर होता.

कोंथिबिरीचीही आवक कमी असल्याने पेंढीचा दर आकारानुसार १५ ते २० रुपये असा होता. हिरवी मिरची, गवार, बिन्स, ढब्बू ८० ते १०० रुपये किलो आहेत. कोबी, टोमॅटोचे दर अद्याप कमी आहेत. फ्लॉवरचा दर वाढला असून २० ते ३० रुपये नगाचा होता. कांदा, बटाट्याचे भाव स्थिर आहेत.

थंडावा देणाऱ्या लिंबू, कलिंगडला मागणी कायम आहे. लिंबूची कर्नाटकातून आवक कमी असल्याने दर अधिक आहेत. नगाचा २ ते ४ रुपयांपर्यंत दर आहे. कलिंगडाची स्थानिक आवक असल्याने दर कमी आहेत. २० ते ६० रुपयांपर्यंत दर होते. कोकणातून हापूस आंब्याची आवक वाढल्याने दर उतरले आहेत.

डझनाचा ३५० ते ५०० रुपये दर होता. अन्य फळांची आवक खूपच कमी आहे. पुढील आठवड्यात ग्रामीण भागातील यात्रांमुळे जनावरांच्या बाजारात बकऱ्यांना मागणी होती. त्यामुळे बकऱ्यांचे दर वाढले होते. सरासरी २ ते ५ हजारांनी दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बकऱ्याचे १५ ते २० हजारांपर्यंत दर होते. शेळ्या-मेंढ्याची सुमारे १२५, तर म्हशींची ५० आवक नोंदली.

तोतापुरी कैरी बारमाही

पूर्वी आंब्याचा हंगाम संपत आला की, तोतापुरी आंब्याची आवक सुरू होत होती. साधारण दोन महिने तोतापुरी आंबा मिळायचा. मात्र, गेल्या ३-४ वर्षांपासून हे चित्र बदलले आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटकातून आता बारमाही तोतापुरी कैऱ्यांची आवक सुरू असते. सध्या नगाला १० ते १५ रुपये दर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com