Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Cotton Production : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ च्या खरीप हंगामात १ लाख ९२ हजार ५२२ हेक्टर कपाशीची लागवड झाली होती.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२३-२४ मधील कापसाची उत्पादकता हेक्टरी ११ क्विंटल ३९ किलो (एकरी ४ क्विंटल ५५ किलो) आली आहे. त्यात रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो (एकरी १ क्विंटल ५९ किलो) आला आहे. पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे.

परभणी जिल्ह्यात २०२३-२४ च्या खरीप हंगामात १ लाख ९२ हजार ५२२ हेक्टर कपाशीची लागवड झाली होती. कापसाची उत्पादकता काढण्यासाठी कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे एकूण ६१२ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते.

त्यापैकी ६०४ पीक कापणी प्रयोग झाले. त्यानुसार जिल्ह्याची कापसाची सरासरी उत्पादकता ११ क्विंटल ३९ किलो आली आहे. रुईचे गुणोत्तर ३५ किलोनुसार रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो आला आहे.

Cotton Production
Cotton Productivity : सिंचनाच्या अभावामुळे कापूस उत्पादकतेत पिछाडी

त्यात परभणी तालुक्यात कापसाची उत्पादकता हेक्टरी १२ क्विंटल ८१ किलो, तर रुईचा उतारा हेक्टरी ४ क्विंटल ४८ किलो आला आहे. जिंतूर तालुक्यातील कापसाची उत्पादकता हेक्टरी १३ क्विंटल ११ किलो, तर रुईचा उतारा हेक्टरी ४ क्विंटल ५९ किलो, सेलू तालुक्यातील कापसाची उत्पादकता हेक्टरी ११ क्विंटल २४ किलो, तर रुईचा उतारा ३ क्विंटल ९३ किलो आला आहे.

Cotton Production
Cotton Production : कापूस उत्पादन वाढीसाठी अतिघनता लागवडीसह यांत्रिकीकरण गरजेचे

मानवत तालुक्यातील कापसाची उत्पादकता हेक्टरी १२ क्विंटल ६८ किलो तर रुईचा उतारा ४ क्विंटल ४४ किलो, पाथरी तालुक्यातील कापसाची उत्पादकता हेक्टरी ८ क्विंटल ४४ किलो तर रुईचा उतारा हेक्टरी २ क्विंटल ९५ किलो, सोनपेठ तालुक्यातील कापसाची उत्पादकता हेक्टरी १२ क्विंटल १९ किलो, तर रुईचा उतारा हेक्टरी ४ क्विंटल २६ किलो आला आहे.

गंगाखेड तालुक्यातील कापसाची उत्पादकता हेक्टरी ८ क्विंटल ७७ किलो, तर रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ७ किलो, पालम तालुक्यातील कापसाची उत्पादकता हेक्टरी ७ क्विंटल ८२ किलो, तर रुईचा उतारा हेक्टरी २ क्विंटल ७३ किलो, पुर्णा तालुक्यातील कापसाची उत्पादकता हेक्टरी १२ क्विंटल ९३ किलो, तर रुईचा उतारा ४ क्विंटल ५२ किलो आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याची २०१७ -१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांतील कापूस रुईचा उतारा सरासरी ३ क्विंटल २ किलो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com