Satej Patil on Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Satej Patil on Shaktipeeth Highway : 'शेतकऱ्यांनी शक्तिपीठ मागितला नाही', जी हुजूर कोण?; आ. सतेज पाटलांनी सरकारला खडसावले

Shaktipeeth Highway In Assembly Monsoon Session 2024 : राज्यातील सर्वात मोठ्या शक्तीपीठ महामार्गला शेतकऱ्यांनी तीव्र विरोधी केला आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होणार असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला विदर्भ, कोकण तसेच सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तर महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता असल्यानेच विरोधकही आंदोलनात उरतले आहेत. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्यातील शेतकरी करत आहे. याच मागणीवरून शनिवारी (ता.२९) अधिवेशनाचा तिसरा दिवस गाजला. शक्तिपीठ महामार्गात २७०००  एकर जमीन जाणार असून पर्यारी मार्ग असताना कोणासाठी प्रकल्प राबवला जात आहे? फक्त २० दिवसात अधिकाऱ्यांनी माहिती काढली आणि घाई घाईत अधिसूचना काढण्यात आली. महामार्गाची मागणी करणारा जी हुजूर कोण आहे? याचा खुलासा सरकराने करावा, अशी मागणी करत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच महामार्ग रद्दच्या मागणमीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने विधान परिषदेचे १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले. 

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाज उठवू असे आ. सतेज पाटील यांनी कोल्हापुरमधील मोर्चात आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली. यावेळी पाटील म्हणाले की, राज्यातील १७ देवस्थान जोडण्यासाठीच महामार्ग तयार केला जात आहे. पण महामार्ग कंत्राटदारांच्या हिताचा असून शेतकऱ्यांच्या जमिनींवर उठलेला आहे. महामार्गामुळे २७ हजार एकर जमीन जाणार आहे. यामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होतील. राज्यात देवस्थान जोडणारे समांतर मार्ग असताना नव्या शक्तिपीठाची गरज काय? असा सवाल पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. 

तसेच फक्त २० दिवसांच्या माहितीच्या आधारे अधिसूचना सरकराने कोणत्या कंत्राटदारासाठी काढली? असा जी हुजूर असणारा कोण? याचा खुलासा सरकराने करावा. कोल्हापूर जिल्ह्यातून इतर मार्ग जाणार आहेत. सध्या कामे देखील सुरू आहेत. त्यासाठी आधीच जमिनीचे अधिगृहन झाले आहे. त्यासाठी कोणीच विरोध केलेला नाही. पण शक्तीपीठाला प्रचंड विरोध आहे. तर शक्तीपीठाला खर्च करणाऱ्या ९६ हजार कोटींपैकी फक्त ५ कोटी रस्त्याला द्या. आमचा वारकरी चालत पंढरपुरला जातो. त्याने कधी रस्ता मागितला नाही. शक्तीपीठाच्या रस्त्याची मागणी नाही. मग कोणाच्या डोक्यातून शक्तीपीठ सुपीक महामार्ग आला? असेही पाटील यांनी म्हटले आहे.  

तसेच पाटील म्हणाले की, एकीकडे शेतकऱ्यांचा आणि गावकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असून ४८ ठिकाणी पूल बांधून पुराला निमंत्रण दिलं जात आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात पूर रोखण्यासाठी २०० कोटी खर्च केले जात आहे. शक्तीपीठातून नक्की कोणाची समृद्धी होणार आहे. गरज नसताना महामार्ग लादला जात आहे. त्यामुळे तो रद्द करावा अशी मागणी सतेज पाटील यांनी केली. 

सतेज पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. भुसे म्हणाले, या महामार्गाच्या संदर्भातील शेतकऱ्यांसह विरोधकांच्या भावना सरकारने जाणून घेतल्या आहेत. तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एसएसआरडीसी लोकभावनांचा आदर करत पुढची दिशा ठरवेल. शेतकरी, नागरीकांच्या भावनाविरोधात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. तर शक्तीपाठाबाबत घोषणा ९ मार्च२०२३ च्या अधिवेशनात करण्यात आल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. मात्र या उत्तरावरून सतेज पाटील समाधानी झाले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गा रद्द करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच विरोधकांनी देखील यावरून गोंधळ सुरू केला. त्यामुळे त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT