Shaktipeeth Express Highway : शक्तीपीठ महामार्गा रद्द करण्यासाठी संसदेत आवाज उठवू; खा. मानेंचा शिंदेंना घराचा आहेर

Dhairyashil Mane : समृद्धी महामार्गानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वाकांशी प्रकल्प असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढत आहे.
Shaktipeeth Express Highway
Shaktipeeth Express HighwayAgrowon

Pune News : नागपूरला थेट गोव्याशी जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आता अडचणीत आला आहे. या महामार्गाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून विरोध वाढत आहे. यादरम्यान जनतेच्या भावनेचा विचार करून, विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मात्र त्यावरून शेतकऱ्यांचे समाधान झालेले दिसत आहे. यादरम्यान खारदार धैर्यशील माने यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवू, असे आश्वासन दिले आहे. माने यांनी हे वक्तव्य सांगली येथे शनिवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या सर्व पक्षीय महामार्गाविरोधातील धरणे आंदोलनात केले. यावेळी खासदार विशाल पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते

गेल्या आठवड्यातच कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात विराट मोर्चा काढला होता. याची धग अद्याप कमी झालेली नाही. यादरम्यान सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी धरणे आंदोलन केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने तेथे उपस्थित होते. यावेळी माने यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत या आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच “शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू असे सांगितले. त्याचबरोबर महामार्गाविरोधात संसदेमध्ये आवाज उठवू” अशीही ग्वाही माने यांनी दिली.

Shaktipeeth Express Highway
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावर मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रतिक्रीया म्हणाले...

माने म्हणाले, “येथे शक्तीपीठ महामार्ग होणार आहे. हा महामार्ग शक्ती वाढवणारा आहे की काढणारा. हेच सध्या आपल्याला कळत नाही. पण जर देवांच्या नावाखाली आमच्या घरावर कोणी नांगर फिरवत असेल, तर देव सुद्धा हे मान्य करणार नाही. असे करणाऱ्याला देव माफ करणार नाही” असा इशारा सरकारला माने यांनी दिला आहे.

Shaktipeeth Express Highway
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा विषय संपला मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती

तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या म्हणण्यानुसार हे जनतेचे सरकार आहे. मात्र प्रत्यक्षात हे सरकार जनतेचे नसून कंत्राटदारांचे असल्याचे आमचं ठाम असल्याची टीका शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केली आहे. तर २५ जूनला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना मोर्चाद्वारे जाब विचारण्याचा इशारा देखील फोंडे यांनी दिला आहे.

पालकमंत्र्याची गाडी आंदोलकांनी आडवली

शक्तीपीठ महामार्गामुळे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे. तर प. महाराष्ट्रातील जिल्ह्यातील शेतकरी भूमीहिन होण्याची भीती आहे. तसेच येथे महामार्गामुळे महापूराचा धोका देखील वाढविण्याचा धोका आहे. त्यामुळे तो रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. यादरम्यान शनिवारी याचा फटका पालकमंत्री सुरेश खाडे यांना बसला. आंदोलकांनी ते नियोजन समितीच्या बैठकीसाठी येत असताना त्यांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवली. त्यावेळी पालकमंत्री खाडे यांनी गाडीतून खाली उतरुन निवेदन स्वीकारले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com