Agriculture Produce Agrowon
ॲग्रो विशेष

Sale of Agriculture Produce : शेतीमाल विक्रीसाठी ‘एमसीएक्स’

मिलिंद आकरे, हेमंत जगताप 

Agriculture E-Market Platform : देशातील समुदाय आधारित संस्था म्हणजेच सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांचे फेडरेशन यांच्यामार्फत पर्यायी बाजारपेठ उभारण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होत आहेत. या प्रक्रियेतील प्रयत्नांची दिशा म्हणजे गोदाम, पॅकहाऊस, स्वच्छता व प्रतवारी यंत्रणा इत्यादी पायाभूत सुविधांची उभारणी आणि यासोबतच नाफेडमार्फत किमान आधारभूत किमतीने होणारी शेतीमालााची खरेदीपर्यंत येऊन थांबली आहे.

शेतीमाल विक्रीच्या विविध पर्यायांमध्ये शेतीमालाचे ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल पद्धतीने विक्री व्यवस्थापन समजावून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात अद्याप या संस्थांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्याचप्रमाणे या प्रकारच्या पर्यायी बाजार व्यवस्थापन निर्मितीमध्ये विविध यंत्रणांचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे परंतु या प्रकारची तांत्रिक माहिती असलेली यंत्रणा व मनुष्यबळ हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.

यापूर्वी आपण ऑनलाइन प्लॅटफॉर्म व शेतीमालाशी निगडित एनईआरएल, एनसीडीईएक्स, एनसीएमएल व एनईएमएल अशा विविध प्लॅटफॉर्म बाबत माहिती घेतली. या साखळीमध्ये आणखी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड( एमसीएक्स) हा आहे.

हे भारतातील पहिले सूचीबद्ध एक्स्चेंज असून शेतीमालााचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करणारे एक अत्याधुनिक कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज आहे. या सुविधेमुळे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह व्यवहारांचे ऑनलाइन ट्रेडिंग सुलभ झाले आहे. यामुळे शेतीमालाच्या किंमतीविषयीचे ज्ञान आणि शेतीमाला विक्रीतील जोखीम व्यवस्थापनासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

एक्स्चेंजची स्थापना २००२ रोजी झाली. संस्थेचे कार्य नोव्हेंबर २००३ मध्ये सुरू झाले. ही संस्था सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सेबीच्या नियमांच्या चौकटीच्या अधीन राहून कार्यरत आहे.

एमसीएक्स अंतर्गत सराफा बाजाराशी संबंधित व्यवहार, औद्योगिक धातू (सोने, चांदी), ऊर्जा (ऑइल, नैसर्गिक वायू) आणि कृषी वस्तू (भात, कापूस, मेंथा ऑइल) इत्यादी बाबतचे व्यवहार, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यात येतात. देशात साठ टक्यांपेक्षा जास्त शेतीमाल फ्युचर्सचे व्यवहार एमसीएक्स मार्फत करण्यात येतात. या करारांमधून तयार केलेल्या निर्देशांकावर सराफा बाजार, बेस मेटल आणि ऊर्जा निर्देशांकावर कमोडिटी ऑप्शन्स आणि फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट सादर करणारे हे भारतातील पहिले एक्स्चेंज आहे.

या एक्सचेंजमार्फत शेतीमाला मूल्य साखळीविषयक व्यवहारांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांना व्यापाराचे सुरक्षित आणि पारदर्शक वातावरण आणि सुविधा पुरविण्यावर भर दिला जातो.

एमसीएक्स संस्था राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून या संस्थेचे दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण ७०९ शहरांमध्ये ५५२ नोंदणीकृत सदस्य आणि ४३,१३९ अधिकृत व्यक्ती आहेत. एमसीएक्स हे भारतातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज असून आर्थिक वर्ष २०२३-२४ (एप्रिल २०२३ - सप्टेंबर २०२३ दरम्यान) मध्ये व्यापार केलेल्या आकडेवारीनुसार संस्थेचा बाजारहिस्सा सुमारे ९५.२४ टक्के आहे.

‘एमसीएक्स’ सोबत विविध कंपन्या

‘एमसीएक्स' शी संबंधित अनेक कंपन्या कार्यरत असून मल्टी कमोडिटी एक्स्चेंज क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (MCXCCL) ही त्यापैकी एक कंपनी आहे. ‘एमसीएक्स'ची ही स्वत:च्या मालकीची उपकंपनी आहे. भारतीय कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमधील हे पहिले क्लिअरिंग कॉर्पोरेशन आहे. या क्लिअरिंग कॉर्पोरेशन मार्फत एक्स्चेंजवर अमलात आणलेल्या खरेदी विक्री व्यवहारांचे क्लिअरिंग आणि सेटलमेंटसह तारण व्यवस्थापन आणि जोखीम व्यवस्थापन या सेवा दिल्या जातात. हे वेब आधारित पोर्टल असून कमोडिटी रिसिप्ट्स इन्फॉर्मेशन सिस्टम्स (COMRIS) द्वारे शेतीमालााचे इलेक्ट्रॉनिक लेखाविषयक कामकाज आणि व्यवहाराच्या पावत्यांचे व्यवस्थापन या सुविधा सुद्धा देण्यात येतात.

जागतिक कमोडिटी बाजारामध्ये सुरळीत कामकाज करण्याच्या उद्देशाने, एमसीएक्स कंपनीने सीएमई ग्रुप आणि लंडन मेटल एक्स्चेंज (LME) यासारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय एक्स्चेंजसोबत धोरणात्मक युती केली आहे.

‘एमसीएक्स'ने डॅलियन कमोडिटी एक्स्चेंज (DCE), तैवान फ्युचर्स एक्स्चेंज (TAIFEX), झेंगझोउ कमोडिटी एक्स्चेंज (ZCE) आणि युरोपियन एनर्जी एक्स्चेंज एजी (EEX) यासारख्या प्रख्यात जागतिक एक्स्चेंजेस सोबत ज्ञान, कौशल्य,शिक्षण आणि प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केले आहेत.

‘एमसीएक्स' सध्या बांगलादेशातील चितगाव स्टॉक एक्स्चेंज येथे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म स्थापन करण्यासाठी एक उपक्रम राबवत असून बांगलादेशातील अशा प्रकारचे हे पहिले व्यासपीठ असेल. एक्स्चेंजने देशभरातील विविध व्यापारी संस्था, उद्योग संघटना आणि शैक्षणिक संस्थांशीही करार केला आहे.

एमसीएक्सला विविध आयएसओ मानक मिळाली असून यात, आयएसओ ९००१:२०१५ गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली, आयएसओ १४००१:२०१५ पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली, आयएसओ २२३०१:२०१९ व्यवसाय सातत्य व्यवस्थापन प्रणाली आणि आयएसओ/ आयईसी २७००१:२०१३ माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली यांचा समावेश आहे.

‘एमसीएक्स’ सभासदत्वाचे प्रकार

ट्रेडिंग कम क्लिअरिंग मेंबर (टीसीएम) / स्टॉक ब्रोकर आणि सेल्फ क्लिअरिंग मेंबर ः

ट्रेडिंग-कम-क्लिअरिंग सदस्य त्यांच्या स्वतःच्या खात्यावर तसेच त्यांच्या क्लायंटच्या खात्यावर व्यापार करण्यास पात्र असून ते स्वत: देखील हे व्यवहार करू शकतात.

पात्रता निकष :

खालील संस्था ‘सेबी‘च्या नियम आणि तरतुदींच्या अधीन राहून आणि एक्स्चेंजच्या नियम, विनियम, उपविधी आणि परिपत्रकामध्ये नमूद तरतुदीनुसार सदस्यत्वासाठी अर्ज करण्यास पात्र असून सर्व प्रकारच्या संस्थांचे पेड-उप कॅपिटल ३० लाख रुपये असणे आवश्यक आहे:

कॉर्पोरेट्स / खासगी कंपन्या- भारतीय कंपनी कायदा १९५६/ २०१३

नोंदणीकृत भागीदारी फर्म- भारतीय भागीदारी कायदा १९३२

लिमिटेड लायबिलिटी भागीदारी फर्म (एलएलपी)- लिमिटेड लायबिलिटी कायदा २००८

एकमेव मालक/व्यक्ती (मालकीच्या फर्म / प्रोप्रायटर फर्म)- भारतीय नागरिक असणे आवश्यक.

इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग कम क्लिअरिंग मेंबर (आयटिसीएम) / स्टॉक ब्रोकर आणि क्लिअरिंग मेंबर

संस्थात्मक ट्रेडिंग कम क्लिअरिंग मेंबर्स त्यांच्या स्वतःच्या खात्यावर तसेच त्यांच्या क्लायंटच्या खात्यावर, स्वतः तसेच ट्रेडिंग मेंबर्स आणि एमसीएक्स एक्स्चेंजचे ट्रेडिंग कम क्लिअरिंग सदस्य यांच्याद्वारे पार पाडलेले व्यवहार करण्याचा अधिकार आहे.

पात्रता निकष

कंपन्या किंवा संस्था‘सेबी‘च्या नियम आणि तरतुदींच्या अधीन राहून आणि एक्स्चेंजच्या नियम, विनियम, उपविधी आणि परिपत्रकामध्ये नमूद तरतुदीनुसार सदस्यत्वासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच संस्थांचे पेड-उप कॅपिटल ३० लाख रुपये असणे आवश्यक आहे.

प्रोफेशनल क्लिअरिंग मेंबर (पिसीएम) / क्लिअरिंग मेंबर

व्यावसायिक क्लिअरिंग मेंबर्स फक्त एमसीएक्स एक्स्चेंजच्या ट्रेडिंग-कम-क्लिअरिंग सदस्यांनी किंवा ट्रेडिंग मेंबर्सद्वारे चालवलेले व्यवहार क्लिअर आणि सेटल करण्यासाठी पात्र आहेत.

पात्रता निकष

सेबीच्या नियम आणि तरतुदींच्या अधीन राहून आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या नियम, विनियम, उप-कायदे आणि परिपत्रकामध्ये तरतूद केल्यानुसार, कोणत्याही कंपन्या, संस्था सदस्यत्वासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच संस्थांचे पेड-उप कॅपिटल ३० लाख रुपये असणे आवश्यक आहे.

ट्रेडिंग मेंबर (टिएम) / स्टॉक ब्रोकर

ट्रेडिंग मेंबर अशा व्यक्ती आहेत ज्यांना अशा प्रकारे प्रवेश दिला गेला आहे, आणि त्यांच्या स्वतःच्या खात्यावर तसेच त्यांच्या ग्राहकांच्या खात्यावर व्यापार करण्याचे अधिकार आहेत. तथापि, ट्रेडिंग मेंबर ला असे व्यवहार साफ करण्याचा आणि सेटल करण्याचा अधिकार नाही.

सर्व ट्रेडिंग मेंबर आमच्या एक्स्चेंजवर क्लिअरिंग अधिकार असलेल्या संस्थात्मक ट्रेडिंग-कम-क्लिअरिंग सदस्य किंवा व्यावसायिक क्लिअरिंग सदस्यांपैकी कोणत्याही एकाशी संलग्न असले पाहिजेत.

पात्रता निकष

खालील संस्था ‘सेबी’च्या नियम आणि तरतुदींच्या अधीन राहून आणि एक्स्चेंजच्या नियम, विनियम, उपविधी आणि परिपत्रकामध्ये नमूद तरतुदीनुसार सदस्यत्वासाठी अर्ज करण्यास पात्र असून सर्व प्रकारच्या संस्थांचे पेड-उप कॅपिटल ३० लाख रुपये असणे आवश्यक आहे:

कॉर्पोरेट्स / खासगी कंपन्या- भारतीय कंपनी कायदा १९५६/ २०१३

नोंदणीकृत भागीदारी फर्म- भारतीय भागीदारी कायदा १९३२

लिमिटेड लायबिलिटी भागीदारी फर्म (एलएलपी)- लिमिटेड लायबिलिटी कायदा २००८

एकमेव मालक/व्यक्ती (मालकीच्या फर्म / प्रोप्रायटर फर्म)- भारतीय नागरिक असणे आवश्यक.

फी आणि अनामत रक्कम

उपरोक्त सर्व प्रकारच्या सभासदत्वासाठी फी व अनामत रक्कम यामध्ये प्रक्रिया शुल्क, प्रवेश शुल्क, ट्रेडिंग शुल्क, वार्षिक शुल्क यांचा समावेश आहे. संस्थांच्या पात्रतेच्या निकषात नेटवर्थची अट नमूद करण्यात आली असून ती १० ते २५ लाखांच्या दरम्यान असेल.

वरील चारही प्रकारच्या मेंबर्समार्फत अधिकृत व्यक्तींची एक्स्चेंजवर व्यवहार करण्याच्या अनुषंगाने नेमणूक केली जाते. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील नमूद प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व प्रकारच्या समुदाय आधारित संस्थानी संपूर्णपणे स्वत: ची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे.

‘एमसीएक्स'' मार्फत शेतीमालााच्या विक्रीव्यवस्थेबाबत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कापूस, कापूस गाठी, पाम तेल व मेंथा तेल यांचा समावेश होतो.

याबाबत संपूर्ण माहिती www.mcxindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. समुदाय आधारित संस्थांनी अशा प्रकारच्या पर्यायी बाजारपेठेबाबत ज्ञान घेऊन बाजारपेठेत प्रवेश करण्यास हरकत नाही, जेणेकरून सद्यःस्थितीत उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचा वापर व या सुविधांसाठी आलेला खर्च याकरिता आर्थिक उत्पन्न सुरू होण्यास मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT