Agriculture Producer : शेतमाल उत्पादनाच्या मध्यवर्ती केंद्रासाठी प्रयत्न करू

Latest Agriculture News : पुरंदर तालुक्यातील बेलसर परिसरात टोमॅटो, डाळिंब आदी फळे व भाजीपाल्याचे मोठे उत्पादन होत असून गायरान जमीन, रस्ते, रेल्वे आदींची सुविधा उपलब्ध आहे तर विमानतळही नियोजित आहे.
Sanjay Jagtap
Sanjay JagtapAgriculture
Published on
Updated on

Pune News : पुरंदर तालुक्यातील बेलसर परिसरात टोमॅटो, डाळिंब आदी फळे व भाजीपाल्याचे मोठे उत्पादन होत असून गायरान जमीन, रस्ते, रेल्वे आदींची सुविधा उपलब्ध आहे तर विमानतळही नियोजित आहे.

याचा उपयोग करून निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बेलसरमध्ये शेतमाल उत्पादनाचे मध्यवर्ती केंद्र उभारल्यास याचा परीसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा,परीसरातील गावांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करीत आमदार संजय जगताप यांनी केले.

Sanjay Jagtap
Agriculture Department : पदभार द्यायलाही ‘दर्जा’चा अधिकारी मिळेना

येथील सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, साहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे माजी जि. प. सदस्य दत्ता झुरंगे, प्रदिप पोमण, सुनीता कोलते, निरा मार्केट कमिटीचे सभापती शरद जगताप आदि उपस्थित होते.

Sanjay Jagtap
Agriculture Irrigation : देगाव कालव्यासाठी ३०० कोटींची तरतूद करणार

यावेळी बोलताना डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी जिल्हा बँकेच्या विविध योजनांची माहिती देत पुरंदर तालुक्यातील विकास सोसायट्यांच्या कामकाजाचे कौतुक केले. बेलसरमध्ये जिल्हा बँकेच्या शाखेसाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

सोसायटीचे अध्यक्ष व्यंकटराव गरुड आणि विलास जगताप यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी केले तर आभार गणेश होले यांनी मानले.

केंद्र शासनाने जिल्ह्यातील १३६६ पैकी ११९२ सोसायट्यांना संगणक संच दिले असून विकास सोसायट्यांनी केवळ पिककर्ज वाटप व वसुली यापुरते मर्यादित न राहता सभासद आणि सोसायटीच्या उत्कर्षासाठी शासनाने १५२ प्रकारचे विविध उपक्रम, योजना दिल्या असून याचा लाभ घ्यावा.
- प्रकाश जगताप, जिल्हा उपनिबंधक .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com