Sale of Agricultural Produce : ' शेतीमाल विक्रीसाठी आधुनिक सुविधांचा वापर

NCDFI E-Market : कॉर्पोरेट, सरकार आणि सरकारी उपक्रमांतर्गत स्थापित कंपन्यांशी सभासद डेअरी सोसायट्यांना योग्य बाजारभाव व बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने एनसीडीएफआय ई-मार्केट या संस्थेची स्थापना करण्यात आली.
Agriculture Produce
Agriculture ProduceAgrowon

Agriculture E-Market Platform : गोदाम आधारित शेतीमाल मूल्य साखळी निर्माण करण्याच्या अनुषंगाने विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्यांनी उभारलेल्या गोदामात एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेडच्या (NEML) साह्याने व्यवसाय उभारणी करणे आवश्यक आहे.

मागील भागात आपण ‘एनईएमएल’बाबत माहिती घेतली, परंतु त्याचा या समुदाय आधारित संस्थांना कशाप्रकारे फायदा होऊ शकेल हे पाहणे आवश्यक आहे. एनईएमएल हा एकात्मिक ई-मार्केट प्लॅटफॉर्म असून या प्लॅटफॉर्मवर खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही शेतीमालाची पारदर्शक किंमत आणि वेळेवर पेमेंटची खात्री दिली जाते. एनईएमएल मार्फत विविध सेवा देऊन या संस्थेने काही प्रगतिदर्शक घटना घडविल्या आहेत.

२०१७ मध्ये एनईएमएलने नाफेडच्या मदतीने किमान आधारभूत किंमत खरेदी प्रक्रियेचे डिजिटायझेशन केल्याने देशातील सर्व शेतकरी वर्गाला शेतीमालाचे थेट खात्यात पैसे जमा करण्यात आले. याकरिता ई-समृद्धी हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले.

२०१८ मध्ये एनईएमएलने देशातील विविध नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) सोबत वित्तीय पुरवठा करण्यासाठी करार केले.

२०१९ मध्ये एमिशन परमिट ट्रेडिंग सिस्टिम तयार करून प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या कामकाजाकरिता नावीन्यपूर्ण प्रणाली तयार करण्यात आली. हे देशातील पहिले प्रदूषणाशी संबंधित ऑनलाइन एक्स्चेंज असून, प्रदूषण निगडित व्यापार या माध्यमातून होणार आहे.

२०२० मध्ये एनईएमएलने नाफेडच्या मदतीने राष्ट्रीय स्तरावर एफपीओकरिता बाजारपेठेची निर्मिती करण्यासाठी ‘नॅशनल ई-किसान मंडी’ (एनईकेएम) प्लॅटफॉर्म तसेच ‘प्रत्यय’ नावाचा ऑनलाइन एक्स्चेंज प्लॅटफॉर्मसुद्धा तयार केला आहे.

Agriculture Produce
Agriculture Producer Company : चौदा शेतकरी कंपन्या स्थापण्याचे उद्दिष्ट

२०२१ मध्ये कृषिवेध हा पहिला देशातील खरेदीदार व विक्रेता यांच्याकरिता ऑनलाइन स्पॉट डिलिव्हरी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.

२०२२ मध्ये एनईएमएलने प्लॅस्टिक कचरा, ई- कचरा निर्मूलनासाठी विविध राष्ट्रीय स्तरावरील कुशल कंपन्यांसोबत करार केले आहेत.

बाजारपेठ निर्मितीकरीता एनईएमएलचे कामकाज नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया (एनसीडीएफआय ई-मार्केट) आणि कृषिवेध या दोन प्लॅटफॉर्मद्वारे चालते.

नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया (एनसीडीएफआय ई-मार्केट)

ही देशातील डेअरी आणि तेल सहकारी संस्थांची सर्वोच्च संस्था असून, राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने (NDDB) त्याची स्थापना केली आहे. कॉर्पोरेट, सरकार आणि सरकारी उपक्रमांतर्गत स्थापित कंपन्यांशी सभासद डेअरी सोसायट्यांना योग्य बाजारभाव व बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली.

१० जून २०१५ मध्ये एनईएमएलने नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया सोबत कामकाज करून एनसीडीएफआय ई-मार्केट प्लॅटफॉर्म तयार केला. एनईएमएलने ई-मार्केट आणि सेवा प्लॅटफॉर्म अनुभवाच्या साह्याने देशातील दुग्ध सहकारी संस्थांकरिता दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांच्या कार्यक्षम खरेदी आणि विक्रीसाठी, एनसीडीएफआय ई-मार्केट प्लॅटफॉर्मचा कार्यक्षम वापर केला आहे.

हा प्लॅटफॉर्म अंतिम वापर करणाऱ्या संस्थांचे कामकाज लक्षात घेऊन विकसित केलेला असून, एनसीडीएफआय ई-मार्केटची रचना खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही सुरक्षित पारदर्शक प्रक्रिया राबविणे, जागतिक स्तरावर पोहोचणे, अल्पावधीतच करार पूर्ण करणे व त्यांचे पालन करणे, व्यवहाराची मार्गदर्शक तत्त्वे, वाजवी बाजारभावाचा शोध, व्यापक प्रसिद्धी, लेखापरीक्षणता, बयाणा ठेवींचा वेळेवर परतावा, संस्थात्मक भांडाराची निर्मिती इ. अनेक फायदे मिळवून देण्यासाठी केलेली आहे.

एनसीडीएफआय ई-मार्केट प्लॅटफॉर्मवरील सदस्यत्व मार्च २०१६ मध्ये १७१ सदस्यांवरून मार्च २०२१ मध्ये २७०६ सदस्यांपर्यंत वाढले आहेत. प्लॅटफॉर्मने २०१९ मध्ये १०१० कोटी ते २०२१ मध्ये ३२४६ कोटी रुपयांचे व्यवहार नोंदवले असून, यामध्ये २२० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे.

एनसीडीएफआय ई-मार्केट प्लॅटफॉर्मद्वारे कोणतीही निविदा काढण्यासाठी देशभरातील सहकारी दुग्ध व्यवसायांसाठी हे एक पसंतीचे ऑनलाइन माध्यम बनत आहे. कोरोना काळात ९१७ नवीन सदस्य पुरवठादारांनी या प्लॅटफॉर्ममध्ये नोंदणी केली आहे. २०२१ मध्ये एकूण सदस्य संख्या २७०६ झाली. डेअरी व्यवसायात मजबूत मूल्य साखळी तयार करण्यासाठी एनसीडीएफआय ई-मार्केट प्लॅटफॉर्म हा एक उत्तम मार्ग आहे.

कृषिवेध

एनईएमएलने समुदाय आधारित संस्था म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्था यांच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने ‘कृषिवेध’ची निर्मिती करण्यात आली.

श्री प्रभुलिंगेश्‍वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. ही कर्नाटक राज्यातील अग्रगण्य शेतकरी उत्पादक संस्था आहे. अलीकडेच या संस्थेने ‘कृषिवेध’वर नोंदणी केली. देशातील कृषी-वस्तूंच्या खासगी खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी हा पहिला ऑनलाइन स्पॉट वितरण प्लॅटफॉर्मचा प्रयोग आहे.

या शेतकरी कंपनीने अलीकडेच कृषिवेद ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अंदाजे २.५ टन हळद सांगली येथील एका खरेदीदाराला बाजारभावापेक्षा ११.७९ टक्क्यांनी जास्त किमतीला विकली. या शेतकरी कंपनीच्या सभासदांना थेट शेतातच मिळालेली ही किंमत होती, ज्यामुळे मालवाहतूक, हाताळणी आणि दलाली खर्चात सुद्धा बचत झाली.

Agriculture Produce
Agriculture Produce : शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यात शेतकरी कंपन्यांचे योगदान

शेतीमाल विक्रीतील अडचणी

श्री प्रभुलिंगेश्‍वर फार्मर प्रोड्यूसर कंपनीने कृषिवेदवर व्यापार चालवण्याआधी, त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांच्या उत्पादनासह प्रत्यक्ष जावे लागायचे. एकदा का शेतकरी शेतीमाल घेऊन बाजारात आल्यावर, प्रचलित बाजारभावावर शेतीमाल विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय नसायचा.

शेतकऱ्यांना हळद सांगलीच्या बाजारपेठेत नेण्यासाठी प्रति क्विंटल १२० रुपये खर्च मालवाहतूक करण्यासाठी आधीच करावा लागायचा. बाजारपेठेत प्रचलित बाजारभाव योग्य नव्हते आणि आर्थिकदृष्ट्या ते व्यवहार्य नव्हते. याशिवाय या विक्रीसाठी त्यांना त्यांच्या शेतीमालासाठी योग्य खरेदीदार शोधण्यासाठी २ ते ३ टक्के दलाली द्यावी लागायची.

याशिवाय शेतकऱ्यांना बाजाराच्या वैयक्तिक नियमांनुसार अनिवार्य वजन आणि इतर प्रशासकीय शुल्क भरावे लागायचे. पीक घेऊन प्रत्यक्ष बाजारात गेल्यावर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे जमा होण्यासाठी ४५ दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागायची. शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल विकल्यानंतर तत्काळ पैशांची गरज भासल्यास, बाजारातील मध्यस्थांकडून त्याच्या पेमेंटमधून आणखी २ ते ३ टक्के पैसे कमी दिले जायचे.

‘कृषिवेध’चे सहकार्य

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध संस्थांसोबत सहकार्य करार केल्यामुळे विश्‍वासार्ह भागीदार म्हणून कृषिवेध प्लॅटफॉर्मचा शेतकरी कंपनीस फायदा झाला.

एनईएमएल ही देशातील एकमेव पूर्ण-सेवा देणारी ई-मार्केट कंपनी असून, संपूर्ण सक्षम तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा आधार बँकिंग, स्वच्छता व प्रतवारी सेवा, वेअरहाउसिंग आणि लॉजेस्टिक इत्यादी सेवा पुरविते.

या ई-प्लॅटफॉर्मचा सभासद बनून श्री प्रभुलिंगेश्‍वर शेतकरी कंपनीने त्याच्या हळद पीक विणाऱ्या, परंतु हळद विकण्यास इच्छुक सभासदांची ऑनलाइन यादी केली, ज्यात त्यांची इच्छित किंमत दर्शविली.

हळद पिकाची पाहणी करण्यासाठी खरेदीदार प्रत्यक्षरीत्या तेरदाल येथे गेला आणि फार्म गेट (थेट शेतातच खरेदी) संकलनासाठी सहमत झाला. बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळण्यासोबतच, शेतकरी कंपनीने त्यांचे उत्पादन बाजारात नेण्यासाठीची वेळ वाचवून खर्चात बचत केली. शिवाय, त्यांनी पारंपरिक बाजारातील मध्यस्थांच्या दलालीच्या पैशातही बचत केली.

कृषिवेदवरील या व्यवहाराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी कंपनी विक्रेत्याला व्यवहार पूर्ण झाल्यापासून दोन दिवसांच्या आत हळदीचा मोबदला मिळेल, याची खात्री करण्यासाठी प्लॅटफॉर्ममध्ये अंगभूत यंत्रणा आणि प्रक्रियेची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्याला केवळ तत्काळ शेतीमालाचे पेमेंट मिळत नाही, तर खर्चात २ ते ३ टक्के बचतदेखील होते. या व्यवहारात ४५ दिवस थांबण्याची आवश्यकता नसते.

कृषिवेध ही एनईएमएल कंपनीने शेतीमाल विक्रीसाठी सुविधा निर्माण केली आहे. यापुढील काळात जास्तीत जास्त शेतकरी कंपन्यांनी या सुविधेचा फायदा आपल्या सभासदांना देणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतकरी कंपनीच्या सभासदत्वाचे महत्त्व पटेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com