Agrowon Agriculture Exhibition 2024 : शेतकरी कंपन्या, महिला बचत गटांच्या उत्पादनांना पसंती

Agriculture Exhibition : कृषी प्रदर्शनात राज्याच्या विविध भागातील महिला बचत गट, शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्यांनी त्यांचे विविध प्रयोग, उत्पादने सादर करून विक्रीस ठेवली आहेत. त्यांच्या उत्पादनांना खरेदीदारांची पसंती मिळत आहे.
Agriculture Exhibition
Agriculture ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Agriculture Expo 2024 : कृषी प्रदर्शनात राज्याच्या विविध भागातील महिला बचत गट, शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्यांनी त्यांचे विविध प्रयोग, उत्पादने सादर करून विक्रीस ठेवली आहेत. त्यांच्या उत्पादनांना खरेदीदारांची पसंती मिळत आहे.

परांडीतांडा (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रघुवीर शैक्षणिक सेवाभावी संस्थेअंतर्गत कार्यरत आदर्श महिला मंडळाने गावातील टाकाऊ अवशेषांपासून कंपोस्ट (सीपीपी) तयार केले आहे. याचा उपयोग जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस होतो. कानेवाडी (ता.जि. छत्रपती संभाजीनगर) येथील निसर्गराजा शेतकरी मंडळाने विविध उत्पादनांचे दालन तयार केले आहे.

Agriculture Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ

मंडळातर्फे शेतकऱ्यांकडून तीळ, धान्याची खरेदी केली जाते. प्रतवारी, स्वच्छता करून थेट ग्राहकांना त्याची विक्री केली जाते. सेंद्रिय ज्वारी, बाजरीचे पीठ तसेच मिरची लोणचेही गटातर्फे विक्रीस उपलब्ध केले आहे. त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गल्लेबोरगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकरी महिला गृह उद्योग यांचा विविध मसाले उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यात चहा, गरम मसाला, लाल मिरची, हळद व धने पावडर, काळा मसाला, कांदा लसूण मसाला आदींची निर्मिती केली जाते. पळसगाव (ता. खुलताबाद) येथील गजरात गटातर्फे तयार गहू व बट्टीचे पीठ तयार केले जाते. ही उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उरत आहेत.

Agriculture Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या भगीरथांच्या चित्तरकथा

शेतकरी कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थ

जटवाडा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील जटकेश्‍वर शेतकरी उत्पादन कंपनीतर्फे विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन केले जाते. त्यांच्यातर्फे दूध, तूप, दही व अन्य उत्पादने तयार केली जातात. ग्राहकांना दूधपुरवठा केला जातो.

आधुनिक दूध संकलन केंद्रासह मका खरेदी व प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. बाजारसावंगी (ता. खुलताबाद) येथील आदर्श शेतकरी उत्पादन कंपनीने आदर्श डेअरी उभारली आहे. अल्पावधीत कंपनीने दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचे देशी गायीचे तूप व कंदी पेढे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com