Market Committee  Agrowon
ॲग्रो विशेष

Market Committee Cess Rate : बाजार समितीत सेस दर कमी; अधिसूचना लागू, कृती समितीच्या प्रयत्नांना यश

Maharashtra Government : राज्य शासनाने अधिसूचना जारी करत १०० रुपये खरेदीसाठी सेसचा किमान दर २५ पैसे तर कमाल दर ५० पैसे केला. या निर्णयाचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनांनी स्वागत केले आहे.

sandeep Shirguppe

Cess Rate Less : बाजार समिती शेतमाल खरेदीचा व्यापाऱ्यांकडून एक रुपया सेस वसूल करत होते. यासाठी व्यापारी कृती समितीकडून आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने अधिसूचना जारी करत १०० रुपये खरेदीसाठी सेसचा किमान दर २५ पैसे तर कमाल दर ५० पैसे केला. या निर्णयाचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनांनी स्वागत केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या अन्नधान्यावरील जीएसटी करामुळे बाजार समितीची बाजार फी (सेस) रद्द करण्यासाठी व्यापारी संघटनांनी आंदोलन केले होते. राज्यव्यापी बंदही पुकारला होता. तर राज्य बाजार समिती सहकारी संघानेही सेस रद्द करण्यास विरोध केला होता. परंतु नुकताच राज्य शासनाने १०० रुपये खरेदीसाठी किमान ७५ पसे आणि कमाल एक रुपया हा दर रद्द करून किमान पंचवीस पैसे आणि कमाल ५० पैसे असा दर केला आहे.

याबाबत महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ (१९६४ चा महा.२०) च्या कलम ३१ च्या उपकलम (१) अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन शासन अधिसूचना जारी केली आहे.

महाराष्ट्र शासन कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून बाजार क्षेत्रातील खरेदी विक्री केलेल्या कृषि उत्पन्नाच्या प्रत्येकी शंभर रुपयाच्या खरेदीवर वरीलप्रमाणे नवीन दर निश्चित केला आहे. या निर्णयाचे स्वागत आम्ही करत असल्याचे मत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष संजय शेटे यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार

State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

SCROLL FOR NEXT