Soybean Market : हमीभावाच्या खाली सोयाबीन विकू नका; आजपासून हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरु; ओलाव्याची अडचण

Soybean Rate : सोयाबीनची हमीभावाने खरेदी आजपासून सुरु झाली. पण सोयाबीन खरेदीत जास्त ओलाव्याची अडचण येत आहे. दुसरीकडे खुल्या बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सरासरी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे.
Sobean
Soybean Agrowon
Published on
Updated on

Pune News : सोयाबीनची हमीभावाने खरेदी आजपासून सुरु झाली. पण सोयाबीन खरेदीत जास्त ओलाव्याची अडचण येत आहे. दुसरीकडे खुल्या बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सरासरी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विकावे, हमीभावाच्या खाली सोयाबीनची विक्री करू नये, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

सध्या बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या सोयाबीनमध्ये ओलावा १८ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बाजारातील आवक हळूहळू वाढत आहे. पण ओलावा जास्त असल्याने हमीभावाने खेरदीत अडथळा येत असल्याचे खरेदी केंद्र चालकांनी सांगितले. कारण हमीभावाने सोयाबीन खेरदीसाठी १२ टक्के ओलाव्याची अट ठेवण्यात आली आहे. म्हणजेच १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास सोयाबीनची खरेदी होणार नाही. त्यामुळे आज खेरदी सुरु झाली तरी खरेदी अडखळतच सुरु आहे. 

Sobean
Soybean MSP : सोयाबीनची हमीभावाने खरेदी आजपासून

आता सोयाबीनची काढणी जोमात सुरु आहे. त्यामुळे पुढच्या काळात सोयाबीनमधील ओलाव कमी होण्यास मदत होईल. सोयाबीनमधील ओलावा कमी झाल्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हमीभावाने सोयाबीनची खरेदी वेग घेईल, असा अंदाज खरेदी केंद्र चालकांनी व्यक्त केला. यंदा महाराष्ट्रात १३ लाख टन सोयाबीनची खरेदी हमीभावाने होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० लाख टनांची खरेदी होणार आहे. तर सध्या २६८ खरेदी केंद्रे सुरु आहेत. या केंद्रांवर सध्या नाव नोंदणीचे काम सुरु आहे.

Sobean
Soybean Market : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी १ हजार ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी

सरकार हमीभावाने खरेदी करणार असल्याने बाजाराला एक आधार आहे. पण शेतकऱ्यांनी आर्थिक चणचण नसेल तर हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विक्री करू नये. तसेच जे शेतकरी थांबू शकतात त्यांनी थांबावे पण हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री टाळावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे. 

यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा पुरवठा जास्त असणार आहे. कारण उत्पादन वाढणार आहे. अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पादन विक्रमी पातळीवर राहील, असा अंदाज आहे. देशातही सध्या उत्पादन जास्त राहील, असा अंदाज आहे. पण पुढच्या काळात देशातील पिकाचे नुकसान किती होते? यावरून नेमकं किती उत्पादन झालं हे स्पष्ट झालं. तसेच ब्राझीलमध्ये सध्या पेरणी सुरु आहे. पुढच्या काळात हवामान कसे राहते? यावरून उत्पादन ठरेल.

सोयाबीन उत्पादनाचे आकडे बदलल्यानंतर दरावर याचे परिणाम दिसून येईल. तसेच देशातील बाजारात जानवारीनंतर सोयाबीनची आवक कमी होत जाईल. सरकारने हमीभावाने खरेदी केल्यानंतर खुल्या बाजारातील भावही हमीभावाच्या दरम्यान पोचतील. त्यानंतर मात्र बाजारातील घडामोडींनुसार दरात तेजी मंदी येईल, असे अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com