Bhaktimarg Highway : बुलडाणा जिल्ह्यातील ‘भक्तिमार्गा’ला अखेर स्थगिती

Suspension of the Highway : बुलडाणा जिल्ह्यातील प्रस्तावित सिंदखेड राजा ते शेगाव हा ‘भक्ती महामार्ग’ अखेर शासनाला रद्द करावा लागला.
Bhaktimarg Highway
Bhaktimarg HighwayAgrowon
Published on
Updated on

Buldana News : बुलडाणा जिल्ह्यातील प्रस्तावित सिंदखेड राजा ते शेगाव हा ‘भक्ती महामार्ग’ अखेर शासनाला रद्द करावा लागला. या संदर्भात १४ ऑक्टोबरला एक अधिसूचना अधिकृत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मार्गासाठी हजारो एकर सुपीक जमीन संपादित करण्यात येणार असल्याने त्याला शेतकऱ्यांमधून प्रचंड विरोध सुरू झाला होता.

समृद्धी महामार्गाला हा मार्ग जोडला जाणार होता. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व शेगाव ही शहरे जोडली जाणार होती. मुंबई, पुणे, नागपूर भागांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी याचा फायदा होणार होता. मात्र या मार्गापेक्षा सध्या अस्तित्वात असलेला पर्यायी मार्ग फायदेशीर आहे. नवीन मार्गामुळे थोडे अंतर कमी होणार होते. मात्र हजारो एकर जमीन हा मार्ग गिळणार होता. त्यामुळे याला विरोध सुरू झाला.

Bhaktimarg Highway
Bhaktimarg Highway : भक्तिमार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी चढले टॉवरवर

शेतकऱ्यांनी गावागावांत आंदोलने केली. महामार्ग विरोधी समितीने ही लढा सुरू केला होता. याला होत असलेला विरोध लक्षात घेत शासनाने सोमवारी (ता. १४) अधिकृतरीत्या याबाबत अधिसूचना काढली आहे. विविध गावांतील जमिनींबाबत जनतेच्या चिंतेमुळे, ८ मार्चची अधिसूचना रद्द करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. राज्यपालांच्या नावाने शासनाचे उपसचिव प्रधान वाळके यांनी ही अधिसूचना जारी केली.

Bhaktimarg Highway
State Highway : बीड जिल्ह्यातील १५ प्रमुख रस्त्यांची राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नती

शेतकऱ्यांच्या लढ्याला ‘ॲग्रोवन’ची साथ

शेतकऱ्यांच्या या लढ्याला शासनापर्यंत पोहोचविण्यात

आल्याने वेळोवेळी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘ॲग्रोवन’चे आभारही मानले होते.

महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने गेले सहा-सात महिने सतत जी आंदोलन केली त्याचे हे यश आहे. गरज नसलेला रस्ता रद्द झाला आणि शेतकऱ्यांची शेती वाचली शेतकरी वाचले याचा मनस्वी आनंद आहे. जी गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही ती नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही. शेतातील काळी माती कृत्रिम पद्धतीने तयार करता येत नाही. नैसर्गिकरीत्या ती तयार व्हायला हजारो वर्षे लागतात, ती आपण वाचवली पाहिजे. ती वाचविण्याच्या आंदोलनात सक्रिय राहता आले आणि सुपीक जमीन वाचवता आली याचा आनंद आहे.
डॉ. सत्येंद्र भुसारी, मुख्य निमंत्रक, महामार्ग विरोधी कृती समिती
माझ्या चिखली मतदार संघातील शेतकऱ्यांचा या भक्तिमार्गाला विरोध होता. त्यामुळे मी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने विधिमंडळात आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिली होते. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर आता ही अधिसूचना निघाली आहे. ही माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाची बाब आहे.
श्वेता महाले, आमदार, चिखली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com