Manoj Jarange Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Sindhudurg Visit : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज (ता.१) सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून, सकाळी आठ वाजता ते मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज (ता.१) सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून, सकाळी आठ वाजता ते मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत.

त्यानंतर त्यांची कुडाळ येथे कॉर्नर सभा होणार आहे. मालवण राजकोट येथे उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा सोमवारी (ता.२६) कोसळला. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. याच मुद्द्यावरून राज्यभरात रणकंदन सुरू आहे.

या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींची माफी मागितली. हा प्रकार घडल्यानंतर मालवण येथे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या बहुतांश नेत्यांनी भेट दिली आहे.

त्यानंतर आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहे, अशी माहिती मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक ॲड. सुहास सावंत यांनी दिली आहे.

आज सकाळी आठ वाजता श्री. जरांगे पाटील हे मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत. शिवछत्रपतींचा पुतळा प्रकरणाची ते माहिती घेणार आहेत. त्यानंतर ते दहा वाजता कुडाळ येथे कॉर्नर सभा घेणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

Drought Relief Planning: दुष्काळ निवारणाचे सूक्ष्म नियोजन करू : फडणवीस

Global Research: युवा संशोधकांनी जागतिक संशोधनात सहभागी व्हावे; डॉ. इनिश ट्रिस्चेर यांचे आवाहन

Sweet Potato Demand: रताळ्यांच्या मागणीत वाढ

Maharashtra Drought: काळीज पिळवटून टाकणारा दुष्काळ

SCROLL FOR NEXT