Manoj Jarange Patil : निर्धार करूया; लढू नाही तर पाडू

Maratha Reservation Update : विधानसभेला दणका देण्याची तयारी करू. सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने येऊन निर्धार करू, लढायचं की कुणाला पाडायचं, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilAgrowon
Published on
Updated on

Nashik News : सरकारला मराठा समाजाच्या वेदना कधीच समजल्या नसून त्यांना आपल्याशी काहाही देणे-घेणे नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे लोकसभेला दणका दिला आहे. त्याचप्रमाणे विधानसभेला दणका देण्याची तयारी करू.

सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने येऊन निर्धार करू, लढायचं की कुणाला पाडायचं, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या शांतता व जनसंवाद रॅलीचा समारोप मंगळवारी (ता. १३) नाशिकमध्ये झाला. या वेळी झालेल्या सभेत मराठा समाजाला एकजूट होण्याचे आवाहन करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तर मंत्री छगन भुजबळ यांचाही समाचार घेतला.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : मराठ्यांच्या लेकरांच्या आरक्षणासाठी घराबाहेर पडा

जरांगे पाटील म्हणाले, की कुणबी आणि मराठा एकच असून मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सर्व पक्षांतील मराठ्यांनो जागे व्हा. भावनिक होऊ नका. समाजाला ४५ वर्षे फसवण्यात आले आहेे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : 'मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागताच आलमट्टी विरोधात लढा उभारणार'

फडणवीस, भुजबळांवर गंभीर आरोप

मंत्री छगन भुजबळ व देवेंद्र फडणवीस यांना दंगली घडवायच्या आहेत. फडणवीस आरक्षण द्यायचे सोडून षड्‌यंत्र आखत आहेत. आजवर इतरांना आरक्षण मिळण्यास मराठ्यांनी विरोध केला नाही; मात्र मराठ्यांना विरोध होत आहे. छगन भुजबळ यांचे ऐकून फडणवीस मराठ्यांना त्रास देत आहेत, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.

भाषणातील मुद्दे...

राजकीय नेत्यांना मोठे करण्यापेक्षा समाजाला मोठे करा.

मी मरणाच्या घटका मोजत असलो तरी समाजाची ताकद वाढवणार, मॅनेज होणार नाही.

खेड्यापाड्यातील मराठा- ओबीसी वाद नको.

ताकदीने उभे राहा, पक्ष नेत्याला पायाखाली तुडवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com