Manoj Jarange Patil : सरकारला २९ सप्टेंबरपर्यंतची वेळ; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

Maratha Reservation Hunger Strike : मनोज जरांगे म्हणाले, की शासनाला २९ सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. या कालावधीमध्ये आमची आरक्षणाची मागणी पूर्ण करा. अन्यथा २९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्र अंतरवाली सराटी येथे माझ्यासह बेमुदत उपोषण करेल. मी उपोषणावर ठाम आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Agrowon
Published on
Updated on

Jalna News : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाला गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याने मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये संवाद मेळावा झाला. या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रवीण दरेकर, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली.

मनोज जरांगे म्हणाले, की शासनाला २९ सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. या कालावधीमध्ये आमची आरक्षणाची मागणी पूर्ण करा. अन्यथा २९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्र अंतरवाली सराटी येथे माझ्यासह बेमुदत उपोषण करेल. मी उपोषणावर ठाम आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : निर्धार करूया; लढू नाही तर पाडू

या वेळी बैठकीत उपस्थित लोकांनी मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये, याकरिता घोषणा दिल्या. मात्र ‘आपण उपोषणावर ठाम आहोत,’ असे श्री. जरांगे यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक लढवायची का समोरच्याला पाडायचे याचा निर्णय निवडणूक जाहीर झाल्यावर समाजाला विश्वासात घेऊन घेणार आहे. या ठिकाणी न भुतो न भविष्य असे मोठे आंदोलन झाले. शासनाने आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला.

लाठी हल्ला केला. षड्‍यंत्र रचले, तरीही आम्ही हटलो नाही आणि यापुढे हटणारही नाही. पाच वेळा बेमुदत उपोषण करावे लागले, मात्र सरकारने दखल घेतली नाही. आता समाज एक झाला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मराठा आरक्षणाबाबत एक वर्ष पूर्ण झाले. सरकारने निर्णय घेतला नाही. गॅझेट, गुन्हे, आरक्षण, प्रश्न सुटले नाही. माझी चौकशी लावली. महिलांवर लाठीहल्ला करून जखमी केले.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राला : शरद पवार

समिती काम करत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकले. भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी मी भोकरदन येथे सभा घेतली म्हणून पोलिस अधीक्षक जालना यांच्यावर दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल केला. रावसाहेब दानवे ज्या विधानसभा मतदारसंघात उभे राहतील, तेथे त्यांना पाडणार असल्याचे श्री. जरांगे यांनी सांगितले. दानवे यांनी चूक दुरुस्ती करावी. खोटे गुन्हे दाखल करून भाजपच्या जागा येणार नाहीत. नागपूरचीही जागा पडेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

कैकाडी, राजपूत, लिंगायत, मराठा, धनगर समाजाचे देवेंद्र फडणवीस यांनी वाटोळे केले आहे. ज्यांनी फडणवीस यांना मोठे केले, त्यांना त्यांनी दिल्लीत पाठवले. फडणवीस यांना सत्तेची मस्ती आहे. पण ते निवडून कसे येतात ते मी बघणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. त्यांचे वीजबिल माफ करा. आरक्षण तसेच विमा भरपाई द्या आदी मागण्याही श्री. जरांगे यांनी या वेळी केल्या.

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे आमच्या टॅक्समधील’

‘लाडकी बहीण’ योजनेद्वारे महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत, ते पैसे काय तुमच्या खिशातून दिले आहेत का, ते तर आमच्या टॅक्समधील पैसे आहेत. मला राजकीय विषयावर बोलायचे नाही. फक्त आम्हाला आरक्षण द्या, अन्यथा आम्ही तुमचे ११३ आमदार पाडणार आहोत. तुमच्या योजनांना जनता आता भुलणार नाही, असेही जरांगे म्हणाले. ‘मी लवकरच मुंबईला येणार आहे. तुम्ही फक्त मुंबईला थांबा. आम्हाला २९ सप्टेंबरपर्यंत सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र द्या. ‘सगेसोयरे’ कायद्याची अंमलबजावणी करा. २००४ चा कायदा लागू करा. गॅझेट लागू करा. अंतरवालीसह राज्यातील गुन्हे परत घ्या. शिंदे समितीचे काम चालू करा. नोंदीची यादी ग्रामपंचायतींमध्ये लावा,’ अशा विविध मागण्याही मनोज जरांगे यांनी या वेळी केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com