Papaya Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : आंबा, नारळ, सुपारी पीक सल्ला

Crop Management : या लेखात आपण आंबा, नारळ, सुपारी पीक सल्ला याबाबतची माहिती पाहणार आहोत.

Team Agrowon

आंबा

Indian Agriculture : सध्याच्या स्थितीत लवकर येणाऱ्या आंबा फळांची तोडणी झालेली आहे. मधल्या टप्प्यातील आंबा फळांची तोडणी सुरू आहे. मेअखेर पर्यंत काही ठिकाणी आंबा फळांची तोडणी सुरू राहणार आहे.

वाढलेल्या तापमानामुळे काढणी होत असलेल्या फळांमध्ये साका होण्याची शक्यता आहे. सध्याच्या काळात दिवस मोठा असल्याने काढणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी. जेणेकरून हवामानातील उष्णतेपासून या फळांचे संरक्षण होईल.

काढणीनंतर फळातील उष्णता कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.फळे सावलीत ठेवावी.फळांची काढणी केल्यानंतर उन्हामध्ये वाहतूक करू नये.

सध्याच्या काळात उशिरा फळे येणाऱ्या बागांमध्ये अति तापमानाचा परिणाम होऊन फळगळ होण्याची शक्यता असते. अशा बागांमध्ये पाणी देण्याचे नियोजन करावे. तसेच १ टक्का पोटॅशिअम नायट्रेटची एक फवारणी करावी. यामुळे फळगळीवर नियंत्रण मिळेल.

नारळ

उन्हाळ्याच्या कालावधीत नारळामध्ये फुलोरा येण्याचे प्रमाण अधिक असते. या काळात झाडाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.

नारळाला ठिबक सिंचनाने पाणी देण्याचे नियोजन करावे. यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

खोडाभोवती ३० सेंमी अंतर सोडून आळ्यामध्ये नारळाची सोडणे, गवत, पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.

सुपारी

वाढलेल्या तापमानामुळे सुपारीची फळगळ होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन झाडांना पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

डॉ. पराग हळदणकर, ९४२१८०९७२१

(संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,

जि. रत्नागिरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT