Soybean Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Disease : सोयाबीन पिकातील करपा रोगाचे व्यवस्थापन

Soybean Crop Management : सध्या हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे सोयाबीन पिकाच्या पानांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनुकूल हवामान राहिल्यास कालांतराने शेंगावरील करपा या रोगाचा देखील प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

डॉ. दत्तात्रय गावडे

Soybean Farming Management :

सध्या हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे सोयाबीन पिकाच्या पानांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनुकूल हवामान राहिल्यास कालांतराने शेंगावरील करपा या रोगाचा देखील प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट येते. त्यासाठी रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे वेळेवर ओळखून उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळीच रोग नियंत्रण होऊन संभाव्य नुकसान टाळता येईल.

रोगकारक बुरशी

ॲन्थ्रॅकनोज, कॉलेक्टोट्रीकम ट्रँकॅटम (Collototrichum truncatum)

लक्षणे

या रोगांचा प्रादुर्भाव पिकाच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. परंतु पीक वाढीच्या अवस्थेत प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.

रोगाची लक्षणे पाने, फांदी व शेंगांवर दिसून येतात.

रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने वेडीवाकडे होऊन गुंडाळतात व वाळायला लागतात.

फांद्यावर, खोडांवर व शेंगावर अनियमितआकाराचे गडद तपकिरी किंवा काळपट डाग दिसून येतात. नंतर ते गडद काळपट होऊन त्यावर बारीक काळे धागे दिसून येतात. असे डाग संपूर्ण पानांवर, फांद्यांवर व शेंगावर होऊन शेंगामध्ये दाणे भरत नाहीत. किंवा दाण्याचा आकार बारीक राहतो.

प्रादुर्भाव जास्त झाला तर संपूर्ण झाड वाळते. शेंगा पोकळ राहतात व उत्पादनात १०० टक्क्यांपर्यंत घट होते.

रोगाची कारणे

प्रादुर्भावीत बियाणे पेरले असल्यास.

लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया न करणे.

उष्ण तापमान व आर्द्रतायुक्त हवामान किंवा बारा तासांपेक्षा अधिक काळ पाऊस, दव व धुके.

एकाच शेतात पुन्हा पुन्हा सोयाबीन पीक घेणे.

एकात्मिक व्यवस्थापन

सोयाबीन पिकाची फेरपालट करावी.

पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

मागील वर्षी त्याच शेतामध्ये सोयाबीन पीक घेतले असल्यास त्या पिकाचे रोगग्रस्त अवशेष नष्ट करावेत.

रासायनिक नियंत्रण (फवारणी : प्रतिलिटर पाणी)

टेब्युकोनॅझोल (१० टक्के डब्ल्यूपी) अधिक सल्फर (६५ टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवा

टेब्युकोनॅझोल (२५.९ ई.सी.) १ मिलि किंवा

टेब्युकोनॅझोल (३८.३९ एस.सी.) १ मिलि किंवा

कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम.

याप्रमाणे १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून २ ते ३ फवारण्या घ्याव्यात.

डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०

(रोगशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT