Soybean Pests and Diseases Management :
डॉ. एस. बी. महाजन, डॉ. एम. पी. देशमुख
सध्याची हवामान स्थिती ही विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक आहे. या काळात सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. प्रभावी नियंत्रणासाठी रोग किंवा किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. वेळीच प्रभावी नियंत्रण मिळविता येईल.
तांबेरा
या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे ५० ते ८० टक्के नुकसान होते.
रोगाचा प्रादुर्भाव हवेमार्फत होतो.
जमिनीलगच्या पानांच्या खालील बाजूस तपकिरी ठिपके दिसून येतात. कालांतराने शेंड्याकडील पानांवर प्रादुर्भाव होतो.
हवामान पोषक असल्यास सर्व पाने तांबूस होऊन पानगळ होते.
प्रामुख्याने पानांवर, काही वेळा कोवळ्या शेंगावर आणि खोडावर देखील प्रादुर्भाव आढळतो.
दमट आणि आर्द्रतायुक्त हवामान रोगाच्या वाढीस अनुकूल असते.
नियंत्रण (फवारणी : प्रतिलिटर पाणी)
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी, मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम.
प्रादुर्भाव दिसून आल्यास,
प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ई.सी.) १ मिलि किंवा
क्रिसॉक्झीम मिथाईल (४४.३ टक्के एससी) १ मिलि किंवा
अझॉक्सिस्ट्रॉबिन (१८.२ टक्के) अधिक डायफेनकोनॅझोल (११.४ टक्के एससी) १ मिलि (संयुक्त)
पानांवरील बुरशीजन्य ठिपके :
या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर खोडावर व शेगांवर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात. कालांतराने पानावरील ठिपक्याचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात.
उपाययोजना : (फवारणी : प्रतिलिटर पाणी)
पिकॉक्सीस्ट्रॉबिन (२२.५२ टक्के एससी) ०.८ मिलि किंवा
टेब्युकोनॅझोल (३८.३९ टक्के एससी) १.२ मिलि किंवा
ॲझोक्सिस्ट्रॉबिन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के एससी) १ मिलि (संयुक्त) किंवा
ॲझोक्सिस्ट्रॉबिन (८.३ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६६.७ टक्के डब्ल्यूजी) ३ ग्रॅम (संयुक्त) किंवा
टेब्युकोनॅझोल (१० टक्के) अधिक सल्फर (६५ टक्के डब्ल्यूजी) २.५ ग्रॅम (संयुक्त).
पिवळा मोझॅक
या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमार्फत होतो.
लक्षणे
रोगग्रस्त झाडाच्या पानांवर हिरवट-पिवळसर रंगाच्या छटा दिसून येतात.
शेंड्याकडील पाने पिवळी पडून लहान होतात.
रोगग्रस्त झाडांना कमी शेंगा लागतात.
उपाययोजना
रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
शेतातील तसेच बांधावरील तणांचा यजमान वनस्पतींचा नाश करावा.
आंतरपीक व मिश्र पीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी आढळते.
पिवळे चिकट सापळे हेक्टरी १५ ते २० या प्रमाणे लावावेत.
रोगाचा प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे.
डॉ. एस बी. महाजन, ९४२११२८३३३
(कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली
(लेखातील सर्व कीटकनाशके आणि बुरशीनाशकांना लेबलक्लेम आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.