Grape Pruning Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Pruning Management : माती, पाणी परीक्षणानुसार द्राक्ष छाटणी व्यवस्थापन करा

Grape Farming : फळ छाटणीला १० ते १५ दिवसांचा कालावधी उरला आहे. दर्जेदार द्राक्ष पिकवण्यासाठी माती, पाणी आणि देठ परीक्षण तितकेच महत्त्वाचे आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : फळ छाटणीपूर्वी माती, पाणी परीक्षण अहवालानुसार पाणी आणि खत व्यवस्थापन केल्यास दर्जेदार द्राक्ष तयार होतील. पाण्याची कमतरता भासणार असून पिकाच्या वाढीनुसार नियोजन करावे, असा सल्ला राष्ट्रीय द्राक्ष संशोधनाचे शास्त्रज्ञ डॉ. अजयकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केले.

सांगलीत सोमवारी (ता. ९) महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने आयोजित चर्चासत्रात डॉ. उपाध्याय बोलत होते. या वेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दीपेंद्र यादव, डॉ. सुजॉय साहा, डॉ. प्रशांत निकुंभ हे प्रमुख उपस्थित होते.

या वेळी प्रदीप चौंदीकर, रवी मोडे, डॉ. मनिष सिंग, शिवानंद नेगी, द्राक्ष संघाच्या सांगली विभागाचे अध्यक्ष संजय बरगाले, मानद सचिव प्रफुल्ल पाटीस मध्यवर्ती विज्ञान समितीचे चेअरमन चंद्रकांत लांडगे यांच्यासह द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते. डॉ. उपाध्याय म्हणाले, की फळ छाटणीला १० ते १५ दिवसांचा कालावधी उरला आहे. दर्जेदार द्राक्ष पिकवण्यासाठी माती, पाणी आणि देठ परीक्षण तितकेच महत्त्वाचे आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी माती, पाणी परीक्षणाच्या अहवालानुसार खत आणि पाणी व्यवस्थापन केल्याने मुळींची चांगली वाढ होण्यास मदत होते. तसेच अन्नद्रव्येही वेलीला चांगल्या प्रमाणात मिळतात. मातीचा पीएच हा ६.५ ते ७.२ टक्के हवा. जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे. त्यासाठी कंपोस्ट खत, शेणखत याचा दरवर्षी वापर केला पाहिजे.

डॉ. यादव म्हणाले, की गेल्या तीन वर्षांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे मिलीबग, थ्रिप्स, लाल कोळी यांचा प्रादुर्भाव कमी होता. मित्र किडींमुळे या किडींचा दिसून आला नाही. परंतु यंदा प्रतिकूल वातावरणामुळे या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी योग्य कीडनाशकांचा वापर करून नियंत्रण आणावे. संजय बरगाले यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT