Maharashtra Politics News agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : 'हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न'; पीक विम्यावरून महाविकास आघाडीची घाणाघाती टीका

Pik Vima Scheme : पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर टीका करण्यास सुरू केली आहे.

sandeep Shirguppe

Crop Insurance One Rupees : राज्यात एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात यावी अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे. या योजनेत बोगस अर्ज आणि गैरव्यवहार होत असल्याने योजनाच बंद करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर टीका करण्यास सुरू केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि रोहीत पवार यांनी एक रुपयात 'पीकविमा योजनेवर आरोप केला आहे.

"राज्यातील एक रुपया पीक विमा बंद करण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे. या योजनेत ३५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कृषी खात्यात भ्रष्टाचाराचा हा बीड पॅटर्न झाला असून धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी झाली पाहिजे" अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवर पुढे म्हणाले की, "महायुती सरकारने 'एक रुपयात पीक विमा' ही योजना आणली होती. त्यावरून आपली पाठ थोपटून बीड पॅटर्नचा गवगवा केला होता. पण या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली असल्याचे समजते.

विशेषत या योजनेत शेतकऱ्यांच्या नावे बोगस अर्ज केल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये एकूण ४ लाख अर्ज बोगस निघाले त्यातील १ लाखाहून अधिक अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यात आढळले आहे. ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न आहे" अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

सरसकट शेतकऱ्यांना दोषी ठरवणे चुकीचे

बोगस अर्जांमुळे तसेच गैरव्यवहारांमुळे ‘एक रुपयात 'पीकविमा योजना’ बंद करण्याचा विचार करणे म्हणजे ‘उन्हात पाय भाजतात म्हणून पायात चप्पल घालण्याऐवजी संपूर्ण पृथ्वीवर चामडे अंथरण्यासारखे आहे’ असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणालेत.

"काही ठराविक लोकांच्या चुकीमुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दंड देणे योग्य होणार नाही. मुळात मुळात आज तंत्रज्ञान एवढे प्रगत असताना बोगस अर्ज येतातच कसे? शासनाकडे शेतकऱ्यांचे आधार कार्ड, ७/१२ उतारे यांचे सर्व डिटेल्स असताना बोगस अर्ज का ओळखता येऊ शकत नाहीत? असा सवालही रोहित पवारांनी केलाय. X माध्यमावर त्यांनी याबाबत पोस्ट केली आहे". असे रोहित पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT