Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचे पोलिस बंदोबस्तात भूसंपादन करण्याच्या सूचना; शेकापकडून आरोप

Shaktipeeth Highway Protest : पोलिस बंदोबस्तात भूसंपादन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी मंगळवार(ता.२१) केला.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Shetkari Kamgar Paksh : कोल्हापूर पाठोपाठ सांगली जिल्ह्यातही शक्तिपीठ महामार्गाविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने कोल्हापूर वगळून इतर जिल्ह्यातील भूसंपादन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिस बंदोबस्तात भूसंपादन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी मंगळवार(ता.२१) केला.

शेकापचे कांबळे म्हणाले की, "शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन २ महिन्यांत पूर्ण करून अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेही प्रांताधिकाऱ्यांना तातडीने मोजणीची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना दिली आहे. भूसंपादनात शेतकऱ्यांचा अडथळा आल्यास पोलिस बंदोबस्त घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. असे कांबळे यांनी सांगितले.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळलं सांगलीलाही वगळा; खासदार विशाल पाटील यांचा सरकारला इशारा

"शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यातील १२ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, भूसंपादन अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन शक्तिपीठच्या कामाला गती द्या अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर लगेच जिल्हा प्रशासनाकडूनही शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादनासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत", असे दिगंबर कांबळे यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना झाडाला बांधून कायदा हातात घेणार

"दडपशाही पध्दतीने महामार्ग शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. म्हणूनच शासनाला जशास तसे उत्तर देण्यात येणार आहे. मोजणीला शेतात अधिकारी, कर्मचारी आल्यास त्यांना झाडाला बांधून ठेवण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी घेऊन देणार नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतीवर सुनावणी न घेता कायदा हातात घेऊन शासन काम करणार असेल तर आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल", असा इशारा दिगंबर कांबळे यांनी दिला.

शक्तिपीठ महामार्ग खानापूर तालुक्यात बाणूरगड येथे प्रवेश करून कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगीवरून तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकीपर्यंत येईल. तेथून मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, बिसूर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडीवरून कोल्हापूर जिल्ह्यात निमशिरगाव येथे प्रवेश करणार आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com