Kolhapur Sangli Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sangli Flood : 'महापूर टाळण्यासाठी नियंत्रण समितीच नाही ही बाब खेदजनक' पूर परिषदेत नाराजी

Flood Control : आंदोलन अंकुश, कृष्णा महापूर नियंत्रण समिती व स्पंदन प्रतिष्ठानतर्फे तिसरी पूर परिषद येथील विठ्ठल मंदिर परिसरात झाली.

sandeep Shirguppe

Maharashtra Flood Control Committee : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पंचगंगा आणि कृष्णेच्या पाण्यामुळे जोरदार महापूर येतो. या महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह अनेकांचे कोट्यावधी रुपयांचे मोठे नुकसान होते. यावर जिल्ह्यातील पूर बाधितांकडून पूर परिषदेचे आयोजन करण्यात आलं होते.नृसिंहवाडी येथे घेण्यात आलेल्या पूर परिषदेत काही ठराव करण्यात आले. तसेच प्रशासनाकडून अद्यापही महापूर टाळण्यासाठीची महाराष्ट्र पूरनियंत्रण समिती अद्याप नाही, हे खेदजनक असल्याचा सूर पूर परिषदेत व्यक्त झाला.

यावेळी विविध दहा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आंदोलन अंकुश, कृष्णा महापूर नियंत्रण समिती व स्पंदन प्रतिष्ठानतर्फे तिसरी पूर परिषद येथील विठ्ठल मंदिर परिसरात झाली. अध्यक्षस्थानी जलअभ्यासक विजयकुमार दिवाण होते.

पाटबंधारे विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एम. के. कुलकर्णी प्रमुख पाहुणे होते. कुलकर्णी म्हणाले, ‘जून-जुलैमध्ये केंद्रीय जल परिचलनानुसार कोयना ते अलमट्टी मार्गावरील कोणत्या धरणात किती पाणी ठेवावे, किती पाण्याचे विसर्ग करावा, या जल परिचलनानुसार पूर्णपणे अंमलबजावणी केल्यास पुराचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.’

दिवाण म्हणाले, ‘अलमट्टी धरणाबरोबर (Almatti Dam) हिप्परगे बॅरेजही (बंधारा) महापुरासाठी कारणीभूत आहे. यासाठी कोल्हापूर बंधाऱ्याच्या धर्तीवर हिप्परगी धरणाचे दरवाजे तळातून काढावेत व नवीन अद्ययावत पद्धतीने ते तयार करावेत.’ या परिषदेत मांडलेल्या ठरावांना दीपक पाटील व राकेश जगदाळे यांनी अनुमोदन दिले. प्रदीप वायचळ, दत्ता उथळे, सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, प्रा. बाळ संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्यजित सोमण, दत्तात्रय जगदाळे, महेश जाधव, भूषण गंगावणे, रशीद मुल्ला, द्वारकानाथ जाधव, दादा गवळी, दीपक कबाडे, जितेंद्र चौगुले, आशाराणी पाटील, एकनाथ माने, बशीर फकीर, महावीर कुंभोजे, जयपाल उगारे, हेमंत बाहुलेकर, आण्णासो आणुजे, बाळासो रजपूत यांच्यासह अनेक कार्यकर्ते पूर परिषदेत उपस्थित होते. आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

परिषदेतील ठराव

केंद्रीय जलआयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांत महापुराच्या पार्श्वभूमीवर समन्वय ठेवावा

कृष्णा खोऱ्यासह अन्य खोऱ्यांतील पाण्याचे परिचलन महापुराच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक पद्धतीने नियोजनबद्ध करावे

पूर काळामध्ये सांगली-जिल्ह्यातील टेंभू-ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवावे

कोयनेपासून अलमट्टीपर्यंतच्या नदीपात्रातील अनधिकृतपणे केलेल्‍या बांधकामांवर कारवाई करावी

कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा नद्यांची पाणी पातळी, त्यामध्ये पडलेला पाऊस व सर्व धरणांतील पाणीसाठा त्यांची एकत्रित माहिती तत्काळ शासनाने पूर काळात पूरग्रस्तांना कळवावी

जिल्ह्यामध्ये जलवैज्ञानिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Rescue : साडे सात तासांची शोधमोहीम; वडनेर दुमालात बिबट्या जेरबंद

Seed Production : महाबीजचा ११ हजार हेक्टरवर परभणीत बीजोत्पादन कार्यक्रम

Rain Crop Damage : साहेब, आता सगळं संपलं; शेतात फक्त पाणीच पाणी

Electricity Bill Issue: वीज बिलातील वाढीव दरांविरोधात शिवसेनेचे संभाजीनगर मुख्य अभियंत्यांना निवेदन

Irrigation Scheme : बेलकुंड उपसा जलसिंचनसाठी १९० कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT