Parbhani News : ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०२५) खरिपात नोंदणीकृत ५ हजार ८६८ शेतकऱ्यांनी ११ हजार ७९० हेक्टरवर विविध पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतला आहे. यंदा सोयाबीनच्या १६ वाणांचे, अशी माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक जे. आर. खोकड यांनी दिली..महाबीजच्या परभणी विभागात दरवर्षी खरिपात सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांचा प्रमाणित व पायाभूत बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येतो. यंदा १४ हजार ८५८ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन १ लाख ९० हजार ६१४ क्विंटल कच्चे बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट होते..Soybean Seed Production: सोयाबीन सीड हबद्वारे दर्जेदार बियाणे निर्मिती.यंदा परभणी जिल्ह्यातील ४६४ गावांत बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जात आहे. त्यात ३६५ गावांतील १ हजार ६६० शेतकरी ३ हजार ३८४ हेक्टर प्रमाणित बीजोत्पादन, तर ९९ गावातील २२७ शेतकरी ४८६ हेक्टरवर पायाभूत बीजोत्पादन घेत आहेत.हिंगोली जिल्ह्यात २५५ गावांत बीजोत्पादन कार्यक्रम असून त्यात २१७ गावांत ९०६ शेतकरी २ हजार २५६ हेक्टरवर प्रमाणित, तर ३८ गावांतील ७२ शेतकरी १५० हेक्टरवर पायाभूत बीजोत्पादन घेत आहेत. .नांदेड जिल्ह्यात ४१० शेतकरी ९१२ हेक्टरवर प्रमाणित, तर जिल्ह्यात २१ शेतकरी ३७ हेक्टरवर पायाभूत बीजोत्पादन घेत आहेत. लातूर जिल्ह्यातील ४६२ गावात बिजोत्पादन कार्यक्रम असून त्यात ३९९ गावातील १ हजार ३१७ शेतकरी २ हजार २९५ हेक्टरवर प्रमाणित तर ६३ गावातील १४७ शेतकरी ३१४ हेक्टरवर पायाभूत बीजोत्पादन घेत आहेत. .Seed Production: ‘दफ्तरी ॲग्रो’तर्फे गुणवत्तापूर्ण बियाणेनिर्मिती.धाराशिव जिल्ह्यात २८९ गावात बीजोत्पादन कार्यक्रम असून त्यात २४४ गावातील ८०६ शेतकरी १ हजार ३८३ हेक्टरवर प्रमाणित बीजोत्पादन, तर ४५ गावातील ८३ शेतकरी १४६ हेक्टरवर पायाभूत बीजोत्पादन घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यात २१९ शेतकरी ४२३ हेक्टरवर प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रम घेत आहेत..सोयाबीनच्या १६ वाणांचे बीजोत्पादन...यंदाच्या बीजोत्पादन कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महाबीज यांच्यासह इतर संशोधन संस्थांनी विकसित केलेल्या विविध पिकांचे बीजोत्पादन घेतले जात आहे. त्यात सोयाबीनच्या एमएयुएस ७२५, एमएयुएस ६१२, एमएयुएस ७१, एमएयुएस १५८, एमएयुएस १६२, केडीस ७५३ (फुले किमया), फुले संगम, फुले दुर्वा, पिडीकेव्ही अंबा, जे. एस. ३३५, जे.एस.९३-०५, जे. एस.२०-११६, एमएसीएस १४६०, राजसोया २४, सुर्वणा सोया,डी. एस.२२८ या १६ वाणांचे बीजोत्पादन घेतले जात आहे. तुरीच्या बीडीएन ७११, बीडीएन ७१६, बीएसएमआर ७३६, गोदावरी, पीबीएन रेणुका, मुगाच्या बीएम २००२-१ बीएम२००३-२, फुले चेतक, उत्कृर्षा, उडदाच्या टिएयु १, एकेयु १०-१, फुले वसू या वाणांचे बिजोत्पादन घेतले जात आहे, असे खोकड यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.