Orchard Plantation : ‘मनरेगा’तून फळझाड लागवडीचे वेळापत्रक निश्‍चित

MGNREGA : खरीप हंगामात शेतकऱ्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत (मनरेगा) चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या फळबाग लागवड कार्यक्रमाचे वेळापत्रक कृषी आयुक्तालयाने जाहीर केले आहे.
Orchard Plantation
Orchard PlantationAgrowon

Pune News : ‘‘खरीप हंगामात शेतकऱ्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत (मनरेगा) चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या फळबाग लागवड कार्यक्रमाचे वेळापत्रक कृषी आयुक्तालयाने जाहीर केले आहे. सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा ‘मनरेगा’तून फळझाडे लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे,’’ अशी माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलाश मोते यांनी दिली.

कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी, अधिकाऱ्‍यांनी लक्षांकाच्या दुप्पट अर्ज प्राप्त होण्यासाठी योजनेला जून महिन्यापर्यंत व्यापक प्रसिध्दी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक महसूली गावात २४ तास अर्ज सादर करता येईल, अशा ठिकाणी अर्ज पेटी ठेवण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Orchard Plantation
Orchard Plantation : राज्यात दहा हजार हेक्टरने फळबाग लागवडी घटल्या

पत्र पेटी दर सोमवारी ग्राम रोजगार सेवकांनी उघडून सर्व अर्ज ऑनलाइन करण्याबाबतची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकांवर राहील. प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या प्रकल्पाची स्थळ पाहणी मे महिनाअखेर तर माती परिक्षणाचे नमुने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घ्यायचे आहेत.

सर्वेक्षण करून क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात द्यावे. वार्षिक कृती आराखड्याप्रमाणे कामास प्रशासकीय मंजुरी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत देण्यात येईल.

Orchard Plantation
Orchard Plantation : ‘रोहयो’तून 60 हजार हेक्टरवर फळबाग लागवड

त्यानंतर काम सुरू करण्याचे आदेश व हजेरी पत्रकही जारी करण्यात येईल. खड्डे खोदणे व आनुषंगिक कामे जूनचा दुसऱ्या पधंरवड्यात, माती तसेच खते व कीटकनाशके, बुरशी नाशके यांची कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली मात्रा याप्रमाणे खड्डे भरणे ही कामे जूनच्या दुस‍ऱ्या आठवड्यापर्यंत करावयाची आहेत.

कलमे, रोपांची लागवड जून ते डिसेंबरपर्यंत

फळबाग लागवडीसाठी लागणाऱ्‍या कलमे-रोपांची मागणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नोंदवायची आहे. कलमे-रोपे रोपवाटिका ते शेतापर्यंतची वाहतूक तसेच निविष्ठा व औषधे उपलब्धताही ऑगस्टअखेर पूर्ण करावयाची आहे. तर कलमे-रोपांची लागवड जून ते डिसेंबर या महिन्यात पूर्ण करावयाची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com