Latur News : जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने हरितक्रांती च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. एकीकडे आमदार अभिमन्यू पवार यांनी जलसमृद्ध औसा अभियान हाती घेत संपूर्ण मतदारसंघ पाणीदार करण्याचा संकल्प केला असताना दुसरीकडे त्यांच्या प्रयत्नांतून मतदारसंघातील बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेसाठी विशेष बाब म्हणून १९० कोटीचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे. या योजनेमुळे बेलकुंडसह परिसरातील तब्बल तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आमदार पवार यांनी दिली. .आमदार पवार यांनी यापूर्वीच निम्न तेरणा प्रकल्पातून बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षण व अन्वेषण कामाला मंजुरी मिळवून घेऊन सर्वेक्षणाचे काम सुरु करवून घेतले होते. सर्वेक्षण व अन्वेषण काम पूर्ण झाल्यानंतर अंदाजपत्रकासह अहवाल मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला होता. .Khandesh Irrigation Project: खानदेशातील सिंचन प्रकल्प रखडले.त्यानंतर या १९० कोटी रुपयांच्या योजनेसाठी शुक्रवारी (ता. २२) विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. योजनेमुळे बेलकुंड व आजूबाजूच्या १० ते १५ गावांमधील जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. योजनेसाठी धरणाजवळ ५२५ एचपी क्षमतेचे चार पंप असलेले पंपगृह उभारले जाणार आहे. .पंपगृहापासून बेलकुंड वितरण कुंडापर्यंत एक हजार ५० एमएम व्यासाची व ७.१५ किलोमीटर लांबीची एमएस पाइपलाइन टाकण्यात येणार असून सिंचन कालावधीत उर्ध्वनलिकेद्वारे पाणी उपसा केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे योजनेतून पूर्वीप्रमाणे कालव्याद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी न देता बंदिस्त पाईपलाईनद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे योजनेसाठी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही आणि पाण्याचा अपव्यय होणार नाही. .Irrigation Project Khandesh : पाडळसे, बुराईसह अनेक सिंचन प्रकल्पांचे भिजत घोंगडे.निम्न तेरणा प्रकल्पाच्या प्रवाही कालव्याद्वारे भिजणारे उमरगा, निलंगा व औसा तालुक्यातील ११ हजार ६१० हेक्टर सिंचन क्षेत्र तसेच आशिव उपसा सिंचन योजनेवरील सहा हजार ८९० हेक्टर सिंचन क्षेत्र व पाणीसाठा कायम ठेवण्यात आला आहे. प्रकल्पाच्या खालील भागात तेरणा नदीवरील बांधण्यात आलेल्या नऊ बॅरेजेसच्या लाभ क्षेत्रातील पाणी वापरात होणारी बचत विचारात घेऊन बेलकुंड उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे..निम्न तेरणा प्रकल्पाचे काम जून १९८९ मध्ये पूर्ण झाले आहे. तेरणा नदीवरील नऊ अस्तित्वातील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेजेस मध्ये रूपांतरण कामे प्रकल्पाचा भाग म्हणून पूर्ण करण्यात आली आहेत. तेरणा नदीवरील बॅरेजेस मध्ये धरणाखालील मुक्त पाणलोट क्षेत्रातील ११.८०२ दलघमी पाणी येवा उपलब्ध होतो बॅरेजेसचे सिंचन क्षेत्र प्रवाही कालव्याचे लाभक्षेत्र एकच आहे. कालवा व बॅरेजेसमधून सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध झाल्याने कालव्याद्वारे पाण्याचा तेवढा वापर होत नाही. यामुळे पाणी वापराचे फेरनियोजन करुन बचत झालेल्या झालेल्या पाण्यातून बेलकुंड उपसा सिंचन योजनेस प्रस्तावित आहे. यापूर्वीच्या कालव्याचा प्रवाही, आशिव उपसा सिंचन व बिगर सिंचन मंजूर पाणीवापरावर काहीच परिणाम झालेला नसून तो कायम ठेवण्यात आला आहे.- आमदार अभिमन्यू पवार, औसा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.