Nashik News : वडनेर दुमाला व पिंपळगाव खांब येथे दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर श्वानाच्या मदतीने वन विभाग व रेस्क्यू टीमच्या संयुक्त अथक प्रयत्नातून शुक्रवारी (ता. २२) जेरबंद करण्यात आला. सलग साडे सात तास शोधमोहीम राबविल्यामुळे प्रयत्नांना यश आले..अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा शुक्रवारी (ता. २२) सकाळपासूनच वडनेर दुमाला परिसरात दाखल झाला होता. सकाळी नऊपासून शोधमोहीम सुरू झाली अन् दुपारी साडेचारच्या दरम्यान मोहन जाधव यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यात आले..Leopard Attack : महिन्याभरात १६ हल्ले; वनविभाग म्हणते घाबरू नका.आयुष किरण भगत या चारवर्षीय चिमुकल्याचा ८ ऑगस्टला रात्री बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये संतापाचे वातावरण होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागानेही मोठी तयारी केली; मात्र बिबट्या काही सापडत नव्हता. संतप्त नागरिकांनी २० ऑगस्टला वन विभागाच्या मुख्य कार्यालयावर मोर्चाही काढला होता. .शुक्रवारी श्वानाद्वारे बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला; दुपारी साडेचारच्या दरम्यान एका उसाच्या शेतात बिबट्या असल्याचे संकेत श्वानाने दिले. ४० कर्मचाऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेताच्या तिन्ही बाजू जाळी लावून बंदिस्त केल्या व उरलेल्या एका बाजूने जाळीमध्ये बिबट्याला अडकविले. त्यानंतर त्यास बेशुद्ध केले. .Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार.पुढील तपासणीसाठी वन्यजीव उपचार केंद्र म्हसरूळ येथे पाठविले. सदर मोहीम मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक वन परिक्षेत्रातील वन्यप्राणी बचाव पथक, रेस्क्यू नाशिक विभाग व संगमनेर रेस्क्यू टीमकडून संयुक्तपणे करण्यात आली..वनपरिक्षेत्र अधिकारी सुमीत निर्मळ यांनी पथकाचे नेतृत्व केले. संगमनेर रेस्क्यू टीम वन्यजीव रक्षक वैभव भोगले, नाशिक वनपरिक्षेत्र वन्यप्राणी बचाव पथकातील वनपाल, वनरक्षक, वाहनचालक, वनमजूर, वन्यजीव पशुवैद्यक डॉ. हेमराज सुखवाल, अभिजित महाले व टीमने मोहीम यशस्वी पार पाडली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.