Almatti Dam
Almatti DamAgrowon

Almatti Dam : ‘अलमट्टी’च्या पाण्यावर महाराष्ट्राचे नियंत्रण हवे

Dam Water Stock : ‘कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील पाणीपातळी जूनपासून ऑगस्टपर्यंत किती असावी, याची निश्‍चिती कायद्याने केली आहे. केंद्रीय जल आयोगाने या बाबत निर्देशही दिले आहेत.

Kolhapur News : ‘कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील पाणीपातळी जूनपासून ऑगस्टपर्यंत किती असावी, याची निश्‍चिती कायद्याने केली आहे. केंद्रीय जल आयोगाने या बाबत निर्देशही दिले आहेत. मात्र याचे पालन होत नाही. जूनपासून ऑगस्टपर्यंत पाणीपातळी कायद्याप्रमाणे राखली जात नाही. त्यामुळे दोन वेळा महापूर आला आहे.

त्यामुळे अलमट्टीच्या पाणीपातळीवर महाराष्ट्र शासनाने समन्वयाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अशी भूमिका कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. या बाबात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवावी, असे निवेदनही त्यांनी आज दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली.

Almatti Dam
Dam Water Stock : ‘मांजरा’त केवळ एक टक्काच जिवंत पाणीसाठा शिल्लक

महापुराचे अभ्यासक विजय दिवाण म्हणाले, ‘‘अलमट्टी धरण हे सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचे मुख्य कारण आहे. अमलट्टी धरणाची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७.४० मीटर ठेवणे बंधनकारक आहे.

Almatti Dam
Water Dam Stock : रत्नागिरीतील धरणांत ४३ टक्के साठा

२०१९, २०२० या वेळी ही पातळी ओलांडल्याने महापूर आले. यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले जलसंपदाचे अभियंता अलमट्टी धरणावर ठेवून दैनंदिन पाणीपातळी नोंदवावी. कर्नाटक शासनाला अलमट्टीमधील पाणीपातळी निर्देशाप्रमाणे ठेवण्यात भाग पाडावे. अन्यथा, पुन्हा महापुराचा धोका निर्माण होईल.

कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र सरकारला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही. आवश्यक ती माहिती, आकडेवारी दिली जात नाही. याबाबत भूमिका मांडण्यासाठी ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. या वेळी संजय कोरे, प्रदीप वायचळ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com