Grains Rangoli Agrowon
ॲग्रो विशेष

Grains Rangoli : गोदाघाटावर साकारली भरडधान्याची महारांगोळी

Marathi New Year Celebration : नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर सुरू असलेल्या पाचदिवसीय महोत्सवात रविवारी (ता. ७) भरडधान्याच्या माध्यमातून ७५ बाय ७५ फूट म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस चौरस फुटांची महारांगोळी साकारली.

Team Agrowon

Nashik News : नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर सुरू असलेल्या पाचदिवसीय महोत्सवात रविवारी (ता. ७) भरडधान्याच्या माध्यमातून ७५ बाय ७५ फूट म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस चौरस फुटांची महारांगोळी साकारली. यातून राष्ट्रहितासाठी मतदान करण्याच्या आवाहनासह मानवी जीवनासाठी सकस अशा भरडधान्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महापालिकेच्या विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तिसऱ्या दिवशी रविवारी (ता. ७) पाडवा पटांगणावर महारांगोळीला सुरुवात झाली. यंदा ‘स्वदेशी’ ही थीम आहे.

नीलेश देशपांडे यांची ही रचना असून या संकल्पनेचे प्रमुख म्हणून आरती गरुड, तर सहप्रमुख म्हणून सुजाता कापुरे व मयूरी शुक्ल यांनी जबाबदारी पार पाडली. वापरलेले भरडधान्य स्वच्छ करून गरजू संस्थांना देण्यात येणार आहे.

यासाठी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल चव्हाण, वास्तुविशारद मिलिंद कुलकर्णी, श्रीकांत वाणी यांचे सहकार्य लाभले. सकाळच्या सत्रात शुभदा जगदाळे या प्रमुख पाहुण्या होत्या. सायंकाळी उद्‌घाटन सोहळ्यास संजय पाटील, चंदुकाका सराफ, लीना बनसोड, जयवंत बिरारी, संजय देवरे, महेंद्र छोरिया आदी मान्यवर उपस्थित होते.

वापरलेले धान्य

महारांगोळीसाठी तब्बल १२०० किलो नाचणी, ३०० किलो वरई, ४०० किलो बाजरी, १०० किलो मूग, ५० किलो कोदरा, ४०० किलो ज्वारी, २०० किलो राळा, १०० किलो उडीद आणि २०० किलो मसूर अशा एकूण ३००० किलो इतक्या भरडधान्याचा वापर केला. १०० महिलांनी अवघ्या चार तासांत ही महारांगोळी साकारली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT