
Pune News : जुन्नर शहर व परिसरातील नागरिकांकडून रानभाजी महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात करटोली, चाव्याचा बहर, रानआळू, कैरीची, बडदेची भाजी, चुरडी, रानकेळी यांसारख्या ४७ प्रकारच्या रानभाज्या, तसेच नाचणी, वरई, राजगिरा यांपासून तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. रानभाज्या व भरड धान्य उत्पादकांच्या मालाची विक्री झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा-आत्मा व कृषी उत्पादक व सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. ५) रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे, उपविभागीय कृषी अधिकारी शिरीष भारती, तहसीलदार रवींद्र सबनीस, कृषी विज्ञान केंद्राचे प्रशांत शेटे, राहुल घाडगे, निवेदिता डावखर, बाजार समितीचे उपसभापती तानाजी दुराफे, सचिव रूपेश कवडे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, नंदू वाणी, हरीश माकर, ऋषिकेश परिवाराचे तुकाराम रावते, सुरेश जोशी, ‘आत्मा’चे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सूर्यकांत विरणक, उपसरपंच अजिंक्य घोलप, धोंडीभाऊ पाबळे, प्रसाद राऊत, दिनेश सावंत उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्राच्या गृहशास्त्रज्ञ निवेदिता डावखर यांनी आहारातील रानभाजीचे महत्त्व व गरज याविषयी मार्गदर्शन केले. रानभाज्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म सांगून रानभाज्यांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी तुकाराम रावते यांनी केली.
शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी असे महोत्सव आयोजित केले जावे, अशी अपेक्षा तहसीलदार सबनीस यांनी व्यक्त केली. विजय हिरेमठ यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत विरणक यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.