Lumpy From Stray Cattle Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Disease: मोकाट जनावरांमुळे फैलावतोय ‘लम्पी’ आजार  

Livestock Crisis: गोवंश हत्या बंदीनंतर भाकड जनावरांचा प्रश्‍न गंभीर रूप धारण करत आहे. गोवंश विक्री होत नसल्याने आणि त्यांच्यापासून उत्पन्न मिळत नसल्याने ही जनावरे गाव, शहरात सोडून देण्यात आली आहेत.

Team Agrowon

Pune News: गोवंश हत्या बंदीनंतर भाकड जनावरांचा प्रश्‍न गंभीर रूप धारण करत आहे. गोवंश विक्री होत नसल्याने आणि त्यांच्यापासून उत्पन्न मिळत नसल्याने ही जनावरे गाव, शहरात सोडून देण्यात आली आहेत. या जनावरांचे कोणतेही लसीकरण होत नसून त्यांना पौष्टीक आहार मिळत नसल्याने ते रोगग्रस्त झाले आहेत.

यामुळे अनेक भटक्या जनावरांना लम्पी स्किनची लागण झाली असून, त्याचा फैलाव वाढत असल्याचे चित्र राज्याच्या खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये आहे. यामुळे मोकाट आणि भाकड जनावरांची जबाबदारी कोणाची हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. 

गोवंश हत्याबंदी झाल्यानंतर भाकड जनावरांच्या कत्तलीसाठी होणाऱ्या विक्रीवर बंदी आली. परिणामी पशुपालकांना उत्पन्न न देणारे पशुधन संगोपन आर्थिक जिकिरीचे होऊ लागले आणि असे पशुधन मोकाट सोडून देण्यात आले.

अशा मोकाट जनावरांचे जथ्थे गाव-खेड्यांत कचरा खाऊन जगत आहेत. तसेच आठवडे बाजार, तालुका बाजार समित्या, जिल्हा बाजार समित्या, त्यांच्या उपबाजारात निर्माण होणारा फळ पालेभाज्यांचा कचरा खाऊन ही जनावरे जगत आहेत.

कोणाचीही मालकी नसणाऱ्या जनावरांना योग्य लसीकरण, पौष्टिक आहार मिळत नसल्याने त्यांचे कुपोषण होऊन ती रोगग्रस्त झाली असल्याचे चित्र आहे. यामुळे त्यांची प्रतिकारक्षमता कमी होत असून, त्यांना विविध आजारांची लागण होत आहे. त्यातच पावसाळ्यात त्यांच्यामध्ये आजारांचा अधिक प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे.

शासकीय अनास्था

ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्याचा आणि औषधोपचार करण्याचा नियम आहे. मात्र याकडेदेखील स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सध्याचे चित्र आहे. यामुळे लम्पीसारखे संसर्गजन्य आजार पसरण्यासाठी मोकाट जनावरेदेखील कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

krushi kumbh: नाशिकच्या ‘कृषिकुंभ’मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा जागर

Health Scheme: मोफत उपचार असताना रुग्णालयांनी पैसे उकळले, ३३८ प्रकरणी कारवाई, आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

IAS Varsha Meena: उष्मालाट दक्षतेबाबत व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी मीना

Carbon Sequestration: कर्ब साठवणूक : कार्बन अर्थव्यवस्थेची संधी

LPG Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’

SCROLL FOR NEXT