Lumpy Skin Disease: पुणे जिल्ह्यात ९०० पशुधन ‘लम्पी’ बाधित

IAS Jitendra Dudi: पुणे जिल्ह्यातील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण मोहीम तसेच लम्पी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यातील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण मोहीम तसेच लम्पी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या.

जिल्ह्यामध्ये गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी या विषाणूजन्य त्वचा आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने त्याचे नियंत्रण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी श्री. डूडी बोलत होते. जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये ‘लम्पी’ने पशुधन आजारी असल्याने आजअखेर ९०६ पशुधनाला या आजाराची बाधा झालेली आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease: ‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावाची पशुसंवर्धनकडून अखेर कबुली

यापैकी औषधोपचाराने ५९१ पशुधन बरे झाले असून १५ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यामध्ये ३०० पशुधनावर उपचार सुरू असून, दिवसेंदिवस आजाराचा प्रसार होऊन यामध्ये वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, जुन्नरमध्ये सर्वाधिक पशुधनाला लम्पीची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या ठिकाणी संसर्ग केंद्राच्या पाच किलोमीटर परिसरामध्ये लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आजार नियंत्रणाच्या दृष्टीने मनुष्यबळ कमी आहे, अशा ठिकाणी जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले. लम्पीने आजारी पशुधनासाठी त्वरित औषधोपचार करण्यात येऊन आजाराचा इतरत्र फैलाव होऊ नये यासाठी गोठा स्वच्छता, जैवसुरक्षा व विविध निर्जंतुक औषधांची फवारणी करण्याचेही निर्देशही श्री. डूडी यांनी दिले.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन आजाराचा पशुधनात वाढता धोका

सध्या जिल्ह्यात लम्पीचा सौम्य प्रादुर्भाव दिसून आला असून उपचारानंतर बहुतांश पशुधन बरे होत आहे. सर्व शासकीय संस्थांमध्ये लम्पीवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषध पुरवठा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतील ५, केंद्र पुरस्कृत योजनेतील १ फिरत्या पशुचिकित्सा पथकाद्वारे पशुपालकांच्या दारात उपचार करण्यात येत आहे. पशुपालकांनी लम्पी बाधित पशुधनावर उपचार करण्यासाठी १९६२ या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित पशुधनावर तत्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केले तर या आजाराचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते, असे गेल्या दोन वर्षांत निदर्शनास आले असून त्यादृष्टीने सर्वांनी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. या वेळी बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, जिल्ह्यातील सर्व सहायक आयुक्त व तालुक्याचे अधिकारी उपस्थित होते.

५,७०,७९१ पशुधनाचे लसीकरण पूर्ण

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बाधित गाव व बाधित गावालगतच्या ५ किलोमीटर परिसरातील गोवर्गीय पशुधनास प्रतिबंधात्मक लसीकरण गोट पॉक्स लशीद्वारे (उत्तरकाशी स्ट्रेन) करण्यात येते. पुणे जिल्ह्यामध्ये २० व्या पशुगणनेनुसार ८,४६,७४५ इतके गोवर्गीय पशुधन आहे. चालू वर्षी २०२५-२६ मध्ये एकूण ५,८०,६०० लस मात्रा वितरित केल्या असून ५,७०,७९१ पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

तसेच ज्या ठिकाणी आजाराचा उद्रेक दिसून येत आहे व ज्या पशुधनास लसीकरण झालेले नाही, त्यासाठी तालुकानिहाय लस मागणी घेण्यात आली असून नव्याने लसमात्रा खरेदी करून पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com