Lumpy Disease : ‘लम्पी’ लसीकरण सुरू; तूर्त आजारी पशूंची नोंद नाही

Lumpy Vaccination : झपाट्याने पसरणाऱ्या लम्पी आजारावर नियंत्रणासाठी लसीकरण सुरू आहे. प्रत्यक्षात लम्पी बाधित जनावराची नोंद नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली.
Animal Vaccination
Animal VaccinationAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : झपाट्याने पसरणाऱ्या लम्पी आजारावर नियंत्रणासाठी लसीकरण सुरू आहे. प्रत्यक्षात लम्पी बाधित जनावराची नोंद नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली. अर्थात, पशुपालकांनी सजग राहण्याची गरज असल्याचेही पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

या संदर्भात अधिक माहितीनुसार, ६ जुलै मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ७६५, जालना जिल्ह्यातील २ लाख ८६ हजार ९००, परभणी जिल्ह्यात २ लाख ३ हजार ४०, तर बीड जिल्ह्यात ३ लाख २३ हजार ३०६ जनावरांना लम्पी लसीकरण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील एकूण ४ लाख ६ हजार ५७८ गोवर्गीय पशुधनाची संख्या आहे.

Animal Vaccination
Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’ आजाराचा ५२ जनावरांना प्रादुर्भाव

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यात २५ हजार २९३, गंगापूर तालुक्यात ३८ हजार ६३३, कन्नडमध्ये ६७ हजार ५७७, खुलताबादमध्ये २६ हजार ७७२, पैठणमध्ये ४६ हजार ८३८, फुलंब्रीमध्ये ५० हजार ३४७, सिल्लोडमधील ५२ हजार ६९४,सोयगावमध्ये २१ हजार ७५१, तर वैजापूरमधील ५६ हजार ६७३ गोवर्गीय पशुधनाचा समावेश आहे.

Animal Vaccination
Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी स्कीन’ पुन्हा डोके वर काढतोय

एप्रिलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आली होते. छत्रपती संभाजीनगर तालुके ४२७०० गंगापूरमध्ये ४८ हजार ७००, कन्नड मध्ये ६७ हजार ९००, खुलताबाद मध्ये २२ हजार ७००, पैठण मध्ये ५४ हजार ५००, फुलंब्री ४३ हजार ६०० सिल्लोड मध्ये ५३ हजार ९६५, सोयगावमध्ये १८ हजार २००, वैजापूरमध्ये ५४ हजार ४०० जनावरांना लसीकरण करण्यात आले.

बीडचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नानासाहेब कदम यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत लम्पी आजाराने बाधित पशूची नोंद झाली नाही. पशुपालकांनी त्याविषयी सजगता बाळगून जनावरांचे लसीकरण व उपचारासाठी शासनाच्या पशुवैद्यकांशी संपर्क करण्याची गरज, असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. सुमारे १९ हजार लसी आपल्याकडे राखीव आहेत. गरजेनुसार त्या दिल्या जात आहेत.
- डॉ. एन. एस. कदम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com