Lumpy Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

Livestock Care: मोहोळ तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा शिरकाव झाला आहे. त्यामध्ये दोन जनावरांचा मृत्यू तर तब्बल ४७ जनावरे बाधित असल्याची माहिती पंचायत समितीचे पशुधन अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली आहे.

Team Agrowon

Mohol News: मोहोळ तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा शिरकाव झाला आहे. त्यामध्ये दोन जनावरांचा मृत्यू तर तब्बल ४७ जनावरे बाधित असल्याची माहिती पंचायत समितीचे पशुधन अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली आहे. 

गेल्या सुमारे महिन्याभरापासून लंम्पी रोगाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. मोहोळ तालुक्यातील शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. एका शेतकऱ्याकडे किमान १० ते १५ गाई आहेत. चांगल्या दुभत्या गाईची किंमत एक लाख रुपये आहे. पुन्हा लम्पी रोगाने शिरकाव केल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

दरम्यान ४७ बाधित जनावरांपैकी ३८ जनावरे लसीकरणामुळे व इतर उपचारामुळे बरी झाली आहेत.लम्पी रोगामु‌ळे प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जनावरांचा आठवडा बाजार, बैलांच्या शर्यती, व जनावरांची वाहतूक करावयाची असेल तर २ दिवसापूर्वीचे ‘गोटपॉक्स’ लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेणे बंधनकारक आहे.

तालुक्यात बहुतांश जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.जनावरांच्या गोठ्यात फवारणी करून गोचिड निर्मूलन करण्यासाठी दवाखान्यात औषधे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नजीकच्या दवाखान्यात बाधित जनावरांना उपचार करून घ्यावेत.

दरम्यान लम्पी हा रोग होऊ नये म्हणून बाधित पशुधनाच्या ५ किमी परिघात संक्रमित न झालेल्या पशुधनास लसीकरण सुरू आहे. तसेच बाधित जनावरांच्या संपर्कातील वैरण, गवत, शव, कातडी, आदी नियंत्रण कक्षातून बाहेर नेण्यास बंदी घातली आहे.

मोहोळ तालुक्यातील जनावरांची सद्य:स्थिती

लसीकरण झालेली जनावरे : ६९ हजार १००

बाधित जनावरे : ४७

बरी झालेली जनावरे : ३८

मृत्यू झालेली जनावरे : २

उपचार सुरू असलेली जनावरे : ७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Compensation: सातारा जिल्ह्यातील ७८२ शेतकऱ्यांना दिलासा, अवकाळीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी मदत मंजूर

Illegal Cotton Seeds: अमरावतीत ८.०५ लाखांचा अवैध बियाण्यांचा साठा जप्त

Fertilizer Shop License Suspension: भंडारा जिल्ह्यातील ३६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Fertilizer Price: खताची जादा दराने विक्री केल्यास दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Raghav Chadha: राघव चड्ढांसह 'आप'च्या ७ खासदारांचा 'भाजप'च्या यादीत समावेश, राज्यसभेतील 'एनडीए'चे संख्याबळ १४० पार

SCROLL FOR NEXT