Lumpy Skin : लसीकरणावर भर देउन ‘लंम्पी स्किन’ ला रोखा

महसूल मंत्री विखे-पाटील यांच्या सूचना
Prevent 'lumpy skin' by focusing on vaccination
Prevent 'lumpy skin' by focusing on vaccinationAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
औरंगाबाद : राज्यात १७ जिल्ह्यात लंम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. राज्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, तसेच राज्यात लसीकरणावर (Vaccination) भर देण्यात येणार असून, परंतु लसीकरण अधिक गतिमान करा अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Prevent 'lumpy skin' by focusing on vaccination
Lumpy Skin Disease : लंपी स्किन आजाराला कसं रोखाल ?

औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात लंम्पी स्कीन आजाराबाबत उपाययोजना संदर्भातील बैठक मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ८) पार पडली. या बैठकीत श्री. विखे पाटील बोलत होते. बैठकीस कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, प्रादेशिक पशु संवर्धन सह आयुक्त संजय गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पी.डी.झोड आदी उपस्थित होते. विभागातील जिल्हाधिकारी, राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

कृषिमंत्री सत्तार म्हणाले, की पशुधन दगावल्या जाणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. जनावरांसाठी आवश्यक तपासणी प्रयोगशाळा जिल्हास्तरावर अद्यावत कराव्यात. यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. आमदार बागडे यांनी जनावरांना योग्य वेळेत उपचार मिळावा, अशी सूचना मांडली. विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास प्राधान्य द्यावे. प्रयोगशाळा अद्यावत करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

Prevent 'lumpy skin' by focusing on vaccination
Lumpy Skin: लंपी स्कीन रोगावर नवी लस विकसित

मृत पावल्यास तातडीने दहा हजारांची
मदत द्या ः श्री.विखे-पाटील म्हणाले
‘‘राज्यात लंम्पी स्कीन आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिकाऱ्यांनी जनजागृती करावी. लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या औषधींची उपलब्धता मुबलक प्रमाणात असावी. पशुधन मृत पावल्यास संबंधित पशुधन मालकास तातडीने जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून दहा हजारांची मदत द्यावी,अशा सूचनाही त्यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी यांना केल्या. लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जनावरांच्या वाहतुकीवरही बंदी आहे. त्याचबरोबर प्रशासनाने प्रभावीपणे उपाययोजना करून जनावरांचा मृत्यूदर कमी करावा,’’ असेही विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com