Lumpy Disease: ‘लम्पी’ची लक्षणे तपासा, उपचार करा

Animal Health: लम्पी त्वचा आजार हा गाई आणि म्हशींना होणारा एक विषाणूजन्य व तीव्र संसर्गजन्य रोग आहे. यामुळे त्वचेवर गाठी, ताप व दूध उत्पादनात घट दिसून येते, त्यामुळे पशुपालकांनी त्वरित उपचार व प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
Lumpy Disease
Lumpy DiseaseAgrowon
Published on
Updated on

डॉ. संघरत्न बहिरे, डॉ. नवीन कुमार

Lumpy Virus Symptoms: लम्पी त्वचा आजार हा जनावरांना, विशेषतः गाई आणि म्हशींना होणारा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. यामुळे जनावरांच्या त्वचेवर गाठी येतात, ताप येतो आणि दूध उत्पादन घटते. हा आजार कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे होतो, हा आजार शेळ्या आणि मेंढ्यांना होणाऱ्या देवीच्या विषाणूशी संबंधित आहे.

हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य असून, डास, माश्या आणि गोचीड यांसारख्या कीटकांद्वारे एका जनावराकडून दुसऱ्या जनावराकडे पसरतो. तसेच दूषित चारा, पाणी आणि उपकरणांद्वारे याचा प्रसार होऊ शकतो. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, इज्जतनगर आणि राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र,हिसार या संस्थेतील तज्ज्ञांनी लम्पी प्रोवॅक ही स्वदेशी लस विकसित केली आहे.

उष्ण आणि दमट हवामानात, विशेषतः पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात जास्त प्रमाणात पसरतो.बाधित जनावरांच्या त्वचेवरील गाठींमधून बाहेर पडणारा स्त्राव, लाळ, दूध, वीर्य आणि रक्त यातूनही विषाणूचा प्रसार होतो.

जनावरांची खरेदी-विक्री, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जनावरांची वाहतूक आणि बाधित जनावरांच्या संपर्कात येण्यामुळे आजार वेगाने पसरतो. दूषित पाणी, चारा आणि जनावरे वापरत असलेली भांडी, दोरखंड यातूनही अप्रत्यक्षपणे संसर्ग होऊ शकतो.

Lumpy Disease
Lumpy Disease Issue: लम्पीने अहिल्यानगरला १४, मोहोळमध्ये दोन पशुधन दगावले

आजाराची साथ एका विशिष्ट हंगामात (उदा. पावसाळा) मोठ्या प्रमाणावर येते, नंतर ती कमी होते. तथापि, विषाणू वातावरणात सुप्त अवस्थेत राहू शकतो आणि अनुकूल परिस्थिती मिळाल्यास पुन्हा उद्रेक होऊ शकतो. लसीकरण न केलेल्या किंवा अपुऱ्या रोगप्रतिकारशक्ती असलेल्या जनावरांमध्ये आजाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते.

विषाणूची तीव्रता

आजाराच्या विषाणूमध्ये संसर्गजन्य क्षमता खूप जास्त असते, सामान्यतः मृत्यू दर कमी असतो, परंतु काहीवेळा तो खूप जास्त असू शकतो. उच्च ताप, त्वचेवर मोठ्या आणि वेदनादायक गाठी, लिम्फ नोड्समध्ये सूज, दूध उत्पादनात घट, अशक्तपणा, आणि काही प्रकरणांमध्ये गर्भपात किंवा वंध्यत्व येऊ शकते. तरुण वासरे किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या जनावरांमध्ये मृत्यू होऊ शकतो. विषाणूची तीव्रता भौगोलिक स्थान आणि जनावरांच्या जातीनुसार बदलू शकते.

बाधित होणारे पशुधन

आजाराचा प्रसार प्रामुख्याने गाई आणि म्हशींना प्रभावित करतो. देशी जातींच्या तुलनेत संकरित जातीच्या गाईंना आजाराचा धोका जास्त असतो. त्यांच्यात गंभीर लक्षणे दिसून येतात.

सर्व वयोगटातील जनावरे या आजारास बळी पडू शकतात, परंतु लहान वासरे आणि दुभत्या जनावरांमध्ये याचा परिणाम अधिक गंभीर असतो.

Lumpy Disease
Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

आर्थिक नुकसान

बाधित जनावरांच्या दूध उत्पादनात लक्षणीय घट होते, जी ३०-४० टक्यांपर्यंत असू शकते. काहीवेळा दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन पूर्णपणे थांबते.

मृत्यू दर कमी असला तरी, मोठ्या संख्येने जनावरे दगावल्याने मोठे आर्थिक नुकसान होते.

बाधित जनावरांवर उपचार करण्यासाठी औषधे, पशुवैद्यकीय सेवा आणि इतर व्यवस्थापनावर खर्च येतो.

तात्पुरते किंवा कायमस्वरूपी वंध्यत्व येऊ शकते.

त्वचेवरील गाठींमुळे कातडीची गुणवत्ता खराब होते, ज्यामुळे चामडे उद्योगाचे नुकसान होते.

वाहतूक, खरेदी-विक्रीवर निर्बंध येतात, ज्यामुळे बाजारावर नकारात्मक परिणाम होतो.

बाधित जनावरे शेतीकाम किंवा इतर कामांसाठी अनुपलब्ध होतात.

प्रतिबंधात्मक उपाय

बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून त्वरित वेगळे करून त्यांना स्वतंत्र गोठ्यात ठेवावे. गोठ्यामध्ये नियमित स्वच्छता राखावी.

जनावरांच्या आहारात पौष्टिक चारा आणि स्वच्छ पाणी देऊन त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवावी.

डास, माश्या आणि गोचीड यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करावा. गोठ्यात जाळी लावावी किंवा धूर करावा.

जनावरांचे नियमितपणे लसीकरण करून घ्यावे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या लसीचा वापर करावा.

जनावरांच्या आहारात पौष्टिक चारा आणि स्वच्छ पाणी देऊन त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवावी.

नवीन जनावरे खरेदी करताना त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि काही दिवस त्यांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.

मृत पावलेल्या जनावरांची योग्य आणि सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावावी (उदा. खोल खड्ड्यात पुरणे), जेणेकरून विषाणूचा प्रसार होणार नाही.

जनावरांमध्ये लम्पी त्वचा आजाराची लक्षणे आढळल्यास, जसे की ताप, त्वचेवर गाठी, डोळे किंवा नाकातून स्त्राव, तर त्वरित आपल्या गावातील पशुधन विकास अधिकारी किंवा जवळच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

लसीकरण

लम्पी त्वचा आजाराच्या नियंत्रणासाठी विषाणूच्या विशिष्ट स्ट्रेनचा वापर करून विकसित केलेल्या समरूप जिवंत-दुर्बळ केलेल्या लसी ज्ञात असलेल्या सर्व एलएसडी विषाणू स्ट्रेनपासून प्रभावीपणे संरक्षण देतात. अनेक युरोपीय देशांमध्ये एलएसडी नियंत्रित करण्यासाठी त्यांचा यशस्वीपणे वापर केला गेला आहे.

सुरुवातीला भारतामध्ये गोटपॉक्स विषाणूच्या उत्तरकाशी स्ट्रेनचा वापर करून तयार केलेल्या विषम लसी वापरल्या. तथापि या लसींनी असंगत संरक्षण दर्शविले. या मर्यादांमुळे, जागतिक प्राणी आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार, समरूप लसी या आजाराच्या नियंत्रणासाठी सर्वात विश्वसनीय उपाय आहेत.

- डॉ. संघरत्न बहिरे, ९४१४८८२८६९

(वैज्ञानिक, प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्र, आयव्हीआरआय, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com