Lumpy Skin Disease: बुलडाण्यात ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात

LSD vaccine for cattle: बुलडाणा जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये गोवर्गीय पशुधनामध्ये लम्पी हा त्वचा आजार पसरत आहे. प्रामुख्याने मलकापूर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, खामगाव आणि चिखली या तालुक्यांमध्ये हा आजार वेगाने वाढत आहे.
lumpy vaccination drive
lumpy vaccination driveAgrowon
Published on
Updated on

Buldana News: बुलडाणा जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये गोवर्गीय पशुधनामध्ये लम्पी हा त्वचा आजार पसरत आहे. प्रामुख्याने मलकापूर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, खामगाव आणि चिखली या तालुक्यांमध्ये हा आजार वेगाने वाढत आहे.

त्यामुळे या लम्पी आजाराच्या पार्श्‍वभूमीवर पशुपालकांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. अमितकुमार दुबे यांनी केले.

lumpy vaccination drive
Animal Vaccination : पशुधनांना ९० टक्के लसीकरण

या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम तसेच जनजागृती अभियान जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सुरू आहे. जिल्ह्यातील मलकापूर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खामगाव आणि चिखली तालुक्यांमध्ये गोवंशीय पशुधनामध्ये लम्पीसदृश लक्षणे आढळली असून, पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडून नमुन्यांचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत.

lumpy vaccination drive
Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

त्यामुळे आजाराचा प्रसार इतर भागांमध्ये होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात एकूण तीन ६०८१५ गोवर्गीय पशुधन असून यापैकी तीन लाख १६५०० पशुधनासाठी लसींचा पुरवठा उपलब्ध आहे.

लम्पी आजारामुळे पशुधनाचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी खबरदारीची पावले उचलणे ही काळाची गरज आहे. पशुपालकांनी लसीकरण व स्वच्छता याकडे गांभीर्याने पाहावे.
डॉ. अमितकुमार दुबे, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com