Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखालीच

Marathwada Water Stock : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील मोठ्या मध्यम व लघु प्रकल्पांपैकी ५२ मध्यम ४९८ लघु तर १० मोठ्या प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील मोठ्या मध्यम व लघु प्रकल्पांपैकी ५२ मध्यम ४९८ लघु तर १० मोठ्या प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. दुसरीकडे दहा मोठ्या प्रकल्पांसह दोन मध्यम व २८ लघु प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच असल्याची स्थिती आहे.

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी १० प्रकल्पात ७५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील एक, बीड व धाराशिवमधील प्रत्येकी दोन, नांदेडमधील तीन व परभणी, हिंगोली, येथील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

७५% पेक्षा जास्त पाणीसाठा असलेल्या ५२ मध्यम प्रकल्पांमध्ये बीडमधील १६ धाराशिव मधील १२ नांदेड मधील नऊ जालन्यातील पाच छत्रपती संभाजीनगर व लातूरमधील प्रत्येकी चार तर परभणीतील दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असलेल्या ४९८ लघु प्रकल्पांमध्ये धाराशिव मधील १२३ लातूरमधील ११२ बीडमधील ९६ नांदेडमधील ७४ जालन्यातील ३४ हिंगोलीतील २५ परभणीतील २० व छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात कमी १४ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या २८ लाख प्रकल्पात छत्रपती संभाजीनगरमधील १६ धाराशिवमधील आठ बीड व लातूरमधील प्रत्येकी एक व जालनातील दोन लघु प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर व जालन्यातील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ही जोत्याखालीच असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

मध्यम प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठा

मराठवाड्यातील एकूण ७५ माध्यम प्रकल्पात सरासरी ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोळा मध्यम प्रकल्पात ७२ टक्के, जालन्यातील सात प्रकल्पात ६८ टक्के, बीड मधील १६ प्रकल्पात ९९ टक्के, लातूर मधील आठ प्रकल्पात ८४ टक्के, धाराशिव मधील १७ प्रकल्पात ८४ टक्के, नांदेड मधील नऊ प्रकल्पात ९७ टक्के तर परभणीतील दोन प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

लघु प्रकल्पात ७८ टक्के पाणीसाठा

मराठवाड्यातील ७५१ लघु प्रकल्पात ७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ प्रकल्पांमधील सरासरी ६० टक्के उपयुक्त पाण्यासह, जालन्यातील ५७ प्रकल्पातील ६६ टक्के, बीड मधील १२६ प्रकल्पातील ८४ टक्के, लातूर मधील १३५ प्रकल्पातील ९२ टक्के, धाराशिव मधील २०६ प्रकल्पातील ६९ टक्के, नांदेड मधील ८० प्रकल्पातील ९३ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पातील ८९ टक्के तर हिंगोलीतील २७ प्रकल्पातील ८३ टक्के उपयुक्त पाणी साठ्याचा समावेश आहे.

पाणीसाठा ९२ टक्क्यांवर

मराठवाड्यातील एकूण ८७९ प्रकल्पांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा ९१.७९ टक्क्यांवर आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांमधील ९७.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठासह ७५ माध्यम प्रकल्पातील ८५.६१ टक्के, ७५१ लघु प्रकल्पातील ७७.९४ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील ८६.९५ टक्के तर तेरणा, मांजरा व रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ८९.८६ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

सात लघु प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघु प्रकल्पांपैकी सात लघु प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. दुसरीकडे ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी, येलदरी, मांजरा, ऊर्ध्व पैनगंगा, निम्न तेरणा, विष्णुपुरी व सीना कोळेगाव हे प्रकल्प तुडुंब आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी सिद्धेश्वरमध्ये ९८ टक्के, माजलगावमध्ये ८२ टक्के, निम्न मनारध्ये ९९ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पात ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT