Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Sale: खानदेशात कापूस बियाणे विक्रीला कमी प्रतिसाद

Khandesh Market Update: खानदेशात बीटीमधील बोलगार्ड २ कापूस बियाणे विक्रीला यंदा कमी मिळाला आहे. यामुळे बियाणे विक्रीअभावी पडून राहिले.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात बीटीमधील बोलगार्ड २ कापूस बियाणे विक्रीला यंदा कमी मिळाला आहे. यामुळे बियाणे विक्रीअभावी पडून राहिले. अनेक नामांकित कंपन्यांना कापूस बियाणे परत मागवावे लागले आहेत. 

यंदा कापूस बियाण्यांचा पुरवठा कंपन्यांकडून वेगात झाला. पण अपेक्षेपेक्षा १० ते १२ पाकिटांची कमी विक्री खानदेशात झाली आहे. सुमारे ४० लाख पाकिटे दाखल झाली होती. जळगावात सुमारे १८ लाख पाकिटांची विक्री झाली आहे. सुमारे सात ते आठ लाख कापूस बियाणे पाकिटे जिल्ह्यातून परत पाठवावी लागली.

अवैध कापूस बियाण्यांचीदेखील विक्री वाढली, यामुळे  बोलगार्ड २ प्रकारच्या कापूस बियाणे पाकिटांची विक्री कमी झाली आहे. सरळ वाणांचा पुरवठा मात्र कमी राहिला. त्याचा पुरवठा खानदेशात जूनच्या मध्यानंतर झाला. यामुळे अनेकांना सरळ वाणांची लागवड करणे शक्य झालेले नाही. काहींनी नाइलाजाने काळ्या बाजारातून सरळ वाण घेवून त्याची लागवड केली. 

सरळ वाणांची मागणी खानदेशात सुमारे चार ते पाच लाख पाकिटांची आहे. पण पुरवठा अल्प झाला. केळी उत्पादक पट्ट्यात या सरळ वाणांची मागणी अधिक असते. त्याचा काळाबाजारही तुटवड्यामुळे काही भागात सुरू झाला होता. जामनेर, रावेर, धुळ्यातील शिरपूर या भागांत जादा दरात सरळ वाणांची विक्री यंदाही झाली आहे.

काही शेतकऱ्यांनी १ जूनपूर्वीच अवैध कापूस बियाण्याची खरेदी जळगाव जिल्ह्यात विविध भागात ओळखीपाळखीच्या भागातून  केली. जळगाव जिल्ह्यात पाच लाख ६६ हजार हेक्टरवर कापूस लागवड २०२२ मध्ये झाली होती. नंतर लागवड सतत कमी झाली. यंदाची लागवड मागील हंगामाच्या तुलनेत एक लाख २० हजार हेक्टरने कमी झाली. याचाही फटका कापूस बियाणे विक्रीवर झाला आहे.

मागील किंवा २०२४ मध्ये जळगाव जिल्ह्यात कापूस लागवड पाच लाख ११ हजार हेक्टरवर झाली होती. खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकही सुमारे दोन लाख हेक्टरवर आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. पण अवैध बियाणे विक्रीमुळे विविध कापूस बियाणे पुरवठादार कंपन्यांचेदेखील नुकसान झाले आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

Agriculture Tools Bank: महिला गटांसाठी कृषी अवजारे बँक

Maharashtra Rain Alert: वादळी पावसासह उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT