Gutkha Crackdown: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुख कर्करोगबाधित कामगार आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग ‘ॲक्शन मोड’वर आला आहे. शुक्रवारी (ता.२९) अधिकाऱ्यांनी बाजार आवारात धाड टाकून दोन टपऱ्यांवर कारवाई केली..गुटखा, तंबाखू, सिगारेटनंतर आता थेट फळे भाजीपाला विभागात देखील कारवाईचे संकेत विभागाने दिले आहेत. याबाबत पणन संचालकांनी रसायने वापरून, फळे भाजीपाला पिकविणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचे पत्र अन्न व औषध प्रशासनाला दिले आहे..Sangli APMC Dispute: बाजार समिती त्रिभाजन याचिकांवरील सुनावणी तहकूब.मुंबई बाजार समितीमध्ये नुकतेच जागतिक तंबाखू मुक्त दिनानिमित्त दोन दिवसीय मोफत तोंडाच्या कर्करोग तपासणी शिबिरात तब्बल ७५ जणात कर्करोगाची लक्षणे आढळली असून, यापैकी २१ संशयित रुग्ण गंभीर आहेत..AI Opportunities for Youth: 'मुंबई टेक वीक'मधून युवकांना मिळणार एआय क्षेत्रात नव्या संधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.त्यांना तातडीने पुढील उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या शिबिरानंतर खडबडून जागे झालेल्या बाजार समिती प्रशासनासह, अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. यानुसार शुक्रवारी (ता.२९) धडक कारवाई करत, दोन टपऱ्या सील करण्यात आल्या..कडक कारवाईची तयारीटपऱ्यावरील कारवाईनंतर आता रसायने वापरून फळे पिकविणारे, विविध शेतीमालाला रंग देणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबर, खाद्यपदार्थ विक्री करणारे आणि भेसळ करणाऱ्यांवरही कडक कारवाईची तयारी सुरू केली आहे. याबाबतचे पत्र पणन संचालक आणि मुंबई बाजार समिती सचिव शरद जरे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.