Flood Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Flood Situation Solution : पुराबाबतचे दीर्घकालीन उपाय दुर्लक्षित

Flood Condition : राज्यातील प्रमुख नद्यांची दुरवस्था झाली असून, अतिक्रमणे व पात्रातील नागरी वसाहतींमुळे मानवनिर्मित पूर तयार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील प्रमुख नद्यांची दुरवस्था झाली असून, अतिक्रमणे व पात्रातील नागरी वसाहतींमुळे मानवनिर्मित पूर तयार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दुसऱ्या बाजूला पूरस्थितीचा शास्त्रीय अभ्यास होऊन देखील दीर्घकालीन उपाय रखडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्याच्या काही भागाला यंदा पुराचा फटका बसल्याने पूर व्यवस्थापनाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आतापर्यंत ३२० तालुक्यांमध्ये स्थानिक सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षाही जादा पाऊस झालेला आहे. मात्र राज्यात सर्वत्र धरणसाठे भरलेले नाहीत. केवळ भीमा व कृष्णा खोऱ्यातील बहुतांश धरणे भरली आहेत.

अर्थात, या धरणांमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी विसर्ग सोडूनदेखील नागरी वसाहतींमध्ये पूरस्थिती तयार झाली. त्यामुळे राज्यातील जलतज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. नद्यांच्या नैसर्गिक वहनात अडथळे आल्यामुळे आता पाणलोट व बिगर पाणलोटातील प्रवाहाचे व्यवस्थापन भविष्यात अतिकठीण होत जाईल. राज्यभरातील पूरस्थिती मुख्यत्वे मानवनिर्मित असून नद्यांना गुलाम बनविणारी व्यवस्था बदलायला हवी, अशी अपेक्षा जलतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

‘कृष्णा व भीमा खोरे पूरस्थितीविषयक कारणे व उपाय अभ्यास समिती’चे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी सांगितले की, नद्यांचे श्र्वास कोंडले गेले आहेत. आता तरी लवकर जागे व्हावे. नदीला तिचे स्वातंत्र्य द्यावे. कोणतीही नदी आपली जीवनदायिनी असते. ती आपली गुलाम नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे, तेव्हा तुम्ही तिच्या छाताडावर रस्ते, इमारती, भुयारी गटारी बांधाल, राडारोडा फेकाल, तिला गटार बनवाल हे असे आता चालणार नाही. नदीने चुपचाप मात्र तुम्हाला भरपूर पाणी पुरवावे, नियमात वाहावे, पूर आणू नये, अशी भ्रामक अपेक्षा आधुनिक मानव कसा ठेवतो याचे मला खूप आश्चर्य वाटते.

भीमा खोरे पूर स्थितीविषयक कारणे व उपाय अभ्यास समिती अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणाले, ‘‘सर्वप्रथम नद्यांना अतिक्रमण मुक्त करावे लागेल. या नद्यांच्या संगम भागात बोगदे काढून काही प्रमाणात पूर नियंत्रित करता येईल. कृष्णा खोरे पूरस्थितीच्या अभ्यासातही मी सामील होतो. ‘अलमट्टी’चा बागुलबुवा आता थांबवावा लागेल. कृष्णेची वहन स्थिती, अतिक्रमणे, राधानगरी प्रकल्पाचे जुनी द्वार संचालन प्रणाली, कृष्णेत येऊन मिळणाऱ्या नद्या व त्यांची स्थिती अशा सर्व मुद्यांमध्ये कृष्णेच्या पूर समस्येची कारणे लपलेली आहेत. ‘अलमट्टी’चे कारण पुढे करणे म्हणजे साप सोडून भुई बडवण्याचा प्रकार आहे. कृष्णा व भीमा अशा दोन्ही खोऱ्यांमधील पूर स्थितीच्या कारणांचा अतिशय सखोल अभ्यास झालेला आहे. आम्ही पर्याय, दीर्घकालीन उपायदेखील शासनाच्या हातात दिलेले आहेत. या उपायांवर कृती करण्याची आता गरज आहे.’’

‘...अन्यथा पूरस्थिती कायमच’

भरपूर पाऊस होत असतानाही काही भागांना दुष्काळाची छाया आणि ठरावीक भागांत पूरस्थितीचा शाप मिळालेल्या महाराष्ट्राला जलनियोजनातील चुका तातडीने दुरुस्त कराव्या लागतील. विकासाच्या नावाखाली नद्यांची घुसमट चालू ठेवल्यास राज्याला मानवनिर्मित पूरस्थितीला कायमचे सामोरे जावे लागेल, असा इशारा जलतज्ज्ञांनी दिला आहे.

नद्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. नद्या बुजवण्याचे सामर्थ्य असल्याची घमेंड माणसाला वाटत असेल तर पूर येणारच! कृष्णा, पंचगंगा, मुळा, मुठा, गोदा, भीमेला पूर्वी पूर येतच होते ना; नद्या मुक्त वाहत होत्या. आता लोकसंख्येने शहरे फुगली. नदीपात्रात ‘रिव्हर व्ह्यू’चे फ्लॅट बांधले. नदी ते सहन करेल; पण तिचा पूर मात्र तुमचे कधीही ऐकणार नाही.
नंदकुमार वडनेरे, अध्यक्ष, ‘कृष्णा व भीमा खोरे पूरस्थितीविषयक कारणे व उपाय अभ्यास समिती’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ८ हजार ७३९ हेक्टर जमिनीचे नुकसान

Grape Crop Damage : नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे करा

Shepherds Migration : पूर्व खानदेशात मेंढपाळ बांधव दाखल

Banana Crop Insurance : केळी पीकविमा परताव्यांचा घोळ कायम

Crop Loan : कर्ज वितरणात जिल्हा बँकांची आघाडी

SCROLL FOR NEXT