Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Connection : प्रतीक्षेतील ६२ हजार घरगुती ग्राहकांच्या घरांत प्रकाश

Agriculture Electricity : घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक व इतर अशा नवीन वीजजोडणी मागणाऱ्या ग्राहकांना महावितरणने त्वरित जोडणी देण्याचा सपाटा लावला आहे.

Team Agrowon

Nagpur News : घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक व इतर अशा नवीन वीजजोडणी मागणाऱ्या ग्राहकांना महावितरणने त्वरित जोडणी देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे वर्षभरात नागपूर परिमंडळात ६२ हजार ८६३ घरगुती ग्राहकांना विजेचा प्रकाश मिळाला. कृषी वीजजोडण्याची ही संख्या ७ हजाराच्या वर पोहोचली आहे.

अर्ज केल्यानंतरही नवीन वीज जोडणी मिळण्यासाठी घरगुती ग्राहकांना वाट पाहावी लागत होती. वीज मीटरचा प्रश्न तसेच कार्यालयात हेलपाटे खावे लागत होते. मात्र, महावितरणने ही प्रक्रिया अधिक गतिमान केली आहे. त्यानुसार ‘इज ऑफ लिव्हिंग’ ही संकल्पना पुढे येऊन त्याला शहरासह ग्रामीण भागात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

मागील वर्षी जानेवारीपासून नवीन वीजजोडणी देण्याच्या कामाला नियोजनपूर्वक वेग देण्यात आला. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये तब्बल ८४ हजार २३७ नवीन वीज कनेक्शन देण्यात आले. यामध्ये ६२ हजार ८६३ घरगुती ग्राहकांचा समावेश आहे.

नागपूर परिमंडळांतर्गत यापूर्वी महिन्याला ५ ते ६ हजार नवीन वीज कनेक्शन देण्यात येत होते. नंतर हा वेग सरासरी महिन्याला ७ हजारांच्या वर गेला आहे. वीज कनेक्शन मागणाऱ्या ग्राहकांना त्रास होऊ नये, तसेच सर्व प्रक्रिया सुलभ व्हावी, असा प्रयत्न महावितरणचा आहे.

अर्ज केल्यानंतर ग्राहकांना कार्यालयात येण्याचा त्रास कमी व्हावा. त्यांना तातडीने नवीन वीजजोडणी मिळावी हा प्रयत्न आहे. ग्राहकांना नवीन सुधारणा देण्याचा मानस आहे. त्यामुळे नवीन वीज जोडणीबाबत रोज आढावा घेतला जात आहे.
दिलीप दोडके, मुख्य अभियंता- नागपूर परिमंडळ, महावितरण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT