Electricity Meter : महावितरणचा मनमानी कारभार, शेतकऱ्यांना माहिती न देताच शेती पंपाची जुने वीज मीटर काढून नवे बसवले

Electricity Meter Kolhapur : खासगी कंपनीमार्फत शेती पंपाची जुनी वीज मोटर काढून त्या ठिकाणी प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहे.
Electricity Meter
Electricity Meteragrowon
Published on
Updated on

Farm Electricity Meter Kolhapur : खासगी कंपनीमार्फत शेती पंपाची जुनी वीज मोटर काढून त्या ठिकाणी प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. मोटरवाचत वेगळी कारणे सांगून प्रीपेड मीटर लावली जात आहेत. ही गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर म्हारुळ (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन करत मीटर काढून महावितरणचे अधिकारी शुभम जंगले यांच्याकडे देत त्यांना धारेवर धरले.

यावेळी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. म्हारुळ येथे महावितरण कंपनीने नेमून दिलेल्या खासगी कंपनीचे काही कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी गेले आणि तुमच्या शेतीपंपाच्या मोटरचे थ्री फेज मीटर आले आहे. आपले मीटर बदलावे लागणार आहे, असे सांगून त्यांना शेतातील मोटरजवळ घेऊन गेले. यावेळी शेतकन्यांनी आमचे जुने मीटर असताना नवीन कशासाठी असा प्रश्न केला असता, यापुढे रीडिंग घेण्यासाठी कोणीही येणार नाही.

या मीटरची रीडिंग आपोआप होणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच या मोटरवरती एक हजार रुपयांचा रिचार्ज फ्री मिळणार असून तो संपल्यानंतर तुम्हाला नवीन रिचार्ज मारावा लागेल, असेही सांगितले, दरम्यान, शेतकऱ्यांनी याला विरोध केला असता हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश आहे, असे सांगून जबरदस्तीने तीन शेतकऱ्यांची मीटर जोडणी केली आहे.

Electricity Meter
Kolhapur Sugarcane : महिलेची ऊस शेतीत क्रांती, एकरी १५० टन उत्पादन घेत मिळवला राज्य पुरस्कार

दरम्यान, शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरणविरोधात आंदोलन करत बसवलेली मीटर काढून महावितरणचे सांगरुळ येथील कनिष्ठ अभियंता शुभम जंगले यांच्याकडे परत करत आम्ही प्रीपेड मिटर बसवणार नाही, याबाबतचे निवेदन दिले.

यावेळी रवींद्र मडके, राजू सूर्यवंशी, एन. के. पाटील, आनंदा शिंदे, राजाराम पाटील, रवींद्र पाटील, उत्तम कासोटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com