Agriculture Electricity Connection : शेतकऱ्यांनी मागणी केल्यास वीज कनेक्शन मिळणार महावितरण अधिकाऱ्यांच्या सूचना

Farm Pump Connection : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी दोन दिवस पाऊस उघडल्यास भाताच्या रोपांसाठी शेती पंप कनेक्शन जोडावे लागेल असे चित्र आहे.
Agriculture Electricity Connection
Agriculture Electricity Connectionagrowon
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामे पूर्ण करत आहे. तणनाशक औषध फवारणी व खते टाकून शेती पिकांना बळकटी देत आहे. परंतु जिल्ह्यात बहुतांश भागात भात शेती असल्याने काही शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. दरम्यान आणखी दोन दिवस पाऊस उघडल्यास भाताच्या रोपांसाठी शेती पंप कनेक्शन जोडावे लागेल असे चित्र आहे.

याबाबत वीज कनेक्शन जोडण्यासाठी इरिगेशन फेडरेशन आणि महावितरण अधिकारी यांच्या बैठक पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी मागणी केल्यास तातडीने वीज कनेक्शन जोडणी देण्यात येईल असे नियोजन केले आहे अशी माहिती फेडरेशनने दिली.

यावेळी इरिगेशन फेडरेशनचे अक्ष्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, पावसाने आणखी उघडीप दिल्यास शेतीपंप सुरू करावे लागतील, शेती पंपांचे वीज कनेक्शन सोडवून ठेवले आहेत. महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत व फेडरेशनचे पदाधिकारी यांची बैठक झाली असून, शेतकऱ्यांनी मागणी केल्यास वीज कनेक्शन जोडले जाणार आहे.

जिल्ह्यात खरिपाचे एक लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये भाताचे ९२ हजार हेक्टर, नागली १७ हजार हेक्टर, भुईमूग ३५ हजार हेक्टर, सोयाबीन ४२ हजार हेक्टर, अशी ९८ टक्के पेरणी झाली आहे.

Agriculture Electricity Connection
Waterfalls In Kolhapur : कोल्हापुरातील धबधब्यांवर जाण्याची बंदी उठवली, विकेंडला करा प्लॅन

उशिरा पाऊस सुरू झाल्यामुळे हातकणंगले, शिरोळ तालुक्यात भुईमूग, सोयाबीनची उशिरा पेरणी झाली. येथे पीक वाढीच्या अवस्थेत आहेत. यातच पावसाने ओढ दिल्यामुळे या तालुक्यात पिकांना पाण्याची गरज भासत आहे. उर्वरित तालुक्यात पावसाची उघडीप ऊस पिकाला फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी सांगितलं.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय दिवेकर म्हणाले की, पावसाने उघडीप दिली असली तरी पिकांना पाण्याचा ताण पडलेला नाही. फक्त शिरोळ, हातकणंगले तालुक्यात पिकांना पाण्याची गरज आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ होणार आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ६७ टक्के पाऊस पडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com