Leopard Attack  Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

Leopard Terror : शहरातील बदादे वस्तीवरील ज्येष्ठ महिला जनाबाई जगन बदादे (वय ६५) ही महिला शेतात काम करत असताना शनिवारी (ता. ९) दुपारी चारच्या सुमारास त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.

Team Agrowon

Nashik News : शहरातील बदादे वस्तीवरील ज्येष्ठ महिला जनाबाई जगन बदादे (वय ६५) ही महिला शेतात काम करत असताना शनिवारी (ता. ९) दुपारी चारच्या सुमारास त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. महिलेच्या मानेचा लचका तोडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन महिन्यांत चौथा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून, महिलेच्या नातेवाइकांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी समजूत घातल्यानंतर नातेवाइकांनी रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिंडोरी शहरालगतच असलेल्या बदादे वस्तीवरील जनाबाई बदादे या शेतात काम करीत असताना दुपारी चारच्या सुमारास मागील बाजूने येऊन बिबट्याने झडप घातली. बिबट्याच्या डरकाळीने व जनाबाई बदादे यांच्या ओरडल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली. जनाबाईचा मोठा मुलगा संजय बदादेही तिकडे धावले, मात्र बिबट्या जनाबाईच्या मानेला जबड्यात पकडून शेतात घेऊन चाललेला दिसला.

या वेळी संजय बदादे यांनी बिबट्याच्या तावडीतून जनाबाईला सोडवले. परंतु मानेच्या मागील बाजूस दुखापत झाल्याने जनाबाईंचा जागीच मृत्यू झाला. त्यांना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वन विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहचले नाही, तसेच वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त केला नाही म्हणून व दिंडोरी शहरातील चौथा बळी असल्याने संप्तत नागरिकांनी नाशिक- वणी सुरत महामार्गावर रास्ता रोको सुरू केला.

त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु सारखे बळी जात असतानाही दिंडोरीकरांनी मृतदेह रस्त्यावर तसाच ठेवत वन विभागाचा निषेध केला.

वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील, वनपाल अशोक काळे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी जाब विचारला. अखेर पाटील व काळे यांनी लेखी आश्‍वासन दिले. पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाइकांची समजूत काढली. नंतर नातेवाइकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. जनाबाई बदादे यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे

Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार

Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ

Rabi Crop Management: शाश्‍वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण

SCROLL FOR NEXT