
चार दिवसांपूर्वीच (ता.१२) डोणवाडी रस्त्यावरील पवार वस्तीवर उषा पवार यांची कालवड बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात जागीच ठार झाली. याआधीच्या पालवण परिसरात सहा ते सात जनावरे ठार झाली होती.
तर चार ते पाच जनावरे गंभीर जखमी झाली. जून महिन्यात पिंपळनेरसह परिसरातील उजनी, व्होळे, भेंड, पालवण, आकुंभे, सापटणे, कन्हेरगाव, दगड अकोले येथील शेतकऱ्यांची १० ते १२ जनावरे हल्ल्यात ठार झाली आहेत.
या परिसरात ऊस व केळी लागवडीच्या वाढत्या क्षेत्रामुळे काही वर्षांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, या प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्याबरोबरच गतवर्षी ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या बैलावरही येथील कारखाना परिसरात हल्ला झाला होता.
पिंपळनेर हद्दीतील शेडशिंगे रस्त्यावर सायंकाळी सातच्या दरम्यान दुचाकीस्वारावर हल्ला केला होता. दुचाकीस्वाराने तातडीने वेग वाढविल्याने तिघेजण बचावले. गतवर्षीच्या तुलनेत बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला होण्याच्या घटनेत यंदा मात्र तिप्पट वाढ झाल्याचे दिसते.
दरवर्षी सप्टेंबर ते मार्च दरम्यान या परिसरात बिबट्याचा वावर आढळतो. यंदा मात्र जून, जुलैमध्येही बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. वन विभागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात ही अद्याप प्राणी अडकला नाही. ड्रोनच्या साह्याने शोधण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, बिबट्या पकडण्यात वनविभागास अद्याप यश आले नाही.
आमदार पाटलांकडून तस्करीचे आरोप
काही दिवसांपूर्वी आमदार अभिजित पाटील यांनी बिबट्यासारखे प्राण्यांची या मार्गावरून तस्करी होत असल्याचे सांगितले होते. तस्करीसाठी आणल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने या भागात प्राणी सोडले जात असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतरही यावर कोणतीही उपाययोजना वनविभागाकडून झालेली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.