Vegetables Rate agrowon
ॲग्रो विशेष

Vegetables Rate : कांदा सत्तरीत, तर बटाटा चाळिशीत, कोल्हापूरच्या आठवडी बाजारात पालेभाज्यांची रेलचेल

sandeep Shirguppe

Kolhapur Vegetables Rate : पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मेथी, शेपू, कांदापात, कोथिंबिरीचे दर पेंडीला वीस ते पंचवीस रुपये इतका आहे. तर दोडका, कारली, पडवळ, दुधी भोपळा, फ्लॉवरचे दर चाळीस ते पन्नास रुपये किलो असा आहे.

टोमॅटोही बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी कमी झालेले टोमॅटोच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे. उत्तर कर्नाटकातून रताळांची आवक वाढली असून, दर ४० ते ६० रुपये प्रतिकिलो असा मिळत आहे. गेले कित्येक दिवस कोथिंबीर चाळीस ते पन्नास रुपये पेंडी असा भाव होता. तो दर वीस ते पंचवीस रुपये असा सुरू आहे.

मेथीचीही आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, दरही २० रुपये पेंडी असा आहे. वांग्याचीही आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, प्रतिकिलोचा दर ३० ते ४० रुपये असा आहे. गवारीचा भाव अजूनही ६० ते १०० रुपये किलो आहे.

सीताफळ, पेरू, सफरचंद आवक वाढली

नव्या फळांची आवक बाजारात वाढली आहे. विशेषतः पेरू, सीताफळ आणि काश्‍मिरी सफरचंदाची आवक झाली आहे. पेरू ६० ते ८० रूपये, सीताफळ १०० ते १२० तर सफरचंद १५० ते १७० रूपये असा दर आहे.

नवा कांदा बाजारात येण्यास उशीर

पावसामुळे नवा कांदा बाजारात येण्यास उशीर असल्याने उपलब्ध कांद्याचे भाव वाढले आहे. त्यामुळे कांदा सत्तर रुपये किलो, तर इंदोरी बटाटा ५० रुपये किलो आहे.

मेथी २० ते ३०, पालक १० ते १५, कांदापात २०, शेपू २०, मिश्र भाजी वाटा १० ते २०, पुदिना १०, अंबाडा १० असा दर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Bajarbhav : सोयाबीनला ६ हजार भाव देणं सरकारला शक्य; सरकारने १३ हजार कोटी खर्च केले तर सोयाबीनला ६ हजार भाव मिळेल

Chemical Fertilizer : रासायनिक खतांची लिकिंगसह खरेदी बंद

Soybean Crop Damage : परतीच्या पावसामुळे सोयाबीन पुन्हा पाण्याखाली

Nano Urea and Agricultural Drones : कृषीत नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे क्रांती होतेय : केंद्रीय मंत्री जोशी

Nar-Par Valley : ‘नार-पार’मधील वाहून जाणारे पाणी करंजवण प्रकल्पात

SCROLL FOR NEXT