Latur News: ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियानांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी गंजगोलाईमध्ये रविवारी (ता. १७) आयोजित लातूर हरितोत्सवासोबत रानभाजी महोत्सवालाही लातूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी हातावर भाकरी घेऊन रानभाज्यांचा आस्वाद घेतला. .यानिमित्ताने महात्मा गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत वृक्षदिंडीत विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, युवक नागरिक सहभागी झाले. हरित लातूरसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करुया, अशी हाक जिल्हाधिकारी ठाकूर यांनी लातूरकरांना दिला.जिल्ह्यात झाडांची संख्या अत्यंत कमी आहे. जिल्ह्याला हरित करण्यासाठी ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान हाती घेण्यात आले आहे..Wild Vegetables : पैठण रोडवरील ‘केव्हीके’त रानभाजी महोत्सवाचे आयोजन.यातून वृक्षलागवडीला गती देण्यात येत असून प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवडीत सहभागी होऊन तिला चळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहनही ठाकूर यांनी या वेळी केले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, महापालिका आयुक्त मानसी मीना, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ आणि संगीता टकले.उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांची प्रमुख या वेळी उपस्थिती होती. महोत्सवात रानभाज्यांच्या विक्रीसाठी उभारलेल्या स्टॉलवर मोठी गर्दी दिसून आली..Wild Vegetables Fair : सातपुड्याच्या पायथ्याशी रंगतोय सालईबन रानभाजी महोत्सव.रानभाज्यांची आणि त्यांच्या पाककृतीची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे यावेळी वितरण करण्यात आले. जीआय मानांकन मिळालेल्या बोरसुरी डाळीच्या खरेदीसह महिला बचत गटांच्या स्टॉलवरील विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यास लातूरकरांनी पसंती दर्शवली. बोरसुरी डाळ, भाकरी, थालीपीठ, धपाटे यांसारख्या पदार्थांचे स्टॉल येथे उभारण्यात आले होते..जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच अधिकाऱ्यांनी रानभाजी व बोरसुरी डाळीच्या वरणाचा आस्वाद घेतला. रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असून, त्या आता दुर्मीळ होत चालल्या आहेत. नवीन पिढीला त्यांची माहिती मिळावी आणि त्यांचे महत्त्व समजावे, यासाठी आत्मा कार्यालयाने आयोजित केलेला रानभाजी महोत्सव उपयुक्त ठरेल, असे ठाकूर यांनी सांगितले..रानभाज्यांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले. रोपे आणि वृक्षलागवडीसाठी आवश्यक साहित्याच्या विक्रीसाठी उभारलेल्या स्टॉलला भेटी देऊन नागरिकांनी रोपांची माहिती घेतली आणि खरेदी केली. .३७ स्टॉलद्वारे रोपांची विक्रीहरितोत्सवात गंजगोलाई ते हनुमान मंदिर चौक परिसरात वन विभाग आणि खासगी रोपवाटिकांचे रोपांचे प्रदर्शन व विक्रीचे जवळपास ३७ स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये औषधी वनस्पती, शोभेची झाडे, परसबागेमध्ये लावण्यायोग्य झाडे, फळझाडे व फुलझाडांची रोपे, वृक्षारोपणासाठी आवश्यक सेंद्रिय खते, कुंड्या व इतर आवश्यक साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. एकाच ठिकाणी विविध प्रकारची रोपे आणि वृक्ष लागवडीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी मोठी खरेदी केली. यातून दोन कोटीहून अधिकच उलाढाल झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.