Jalana News: जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात २४ कोटी ९० लाख ७७ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सहायक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत, तहसील कार्यालयातील अनेक ग्राममहसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांच्या लॉगिन आयडीचा गैरवापर करून बोगस लाभार्थ्यांना पैसे वाटल्याचा आरोप आहे. त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीत गैरप्रकारांना दुजोरा मिळाला असून, पुरावे नष्ट करण्याचेही प्रयत्न झाले. या घोटाळ्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे..घोटाळ्याचा पर्दाफाश२०२२, २०२३ आणि २०२४ या वर्षांत अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, नापिकी आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले होते. मात्र, या अनुदानाच्या वाटपात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय जालना, तहसील कार्यालय अंबड, घनसावंगी आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबड यांच्याकडे प्राप्त झाल्या..Jalna Subsidy Scam : अनुदान अपहारप्रकरणी दहा ग्राम महसूल अधिकारी निलंबित.या तक्रारींमध्ये बोगस लाभार्थ्यांना पैसे देणे, इतर गावातील किंवा तालुक्यातील व्यक्तींना अनुदान देणे, कमी शेती असताना जास्त शेती दाखवून फळबागांचे अनुदान मिळवणे, बोगस आधार क्रमांक टाकून दुबार पैसे घेणे, तसेच शासकीय जमीन शेतकऱ्यांच्या नावे दाखवून आप्तस्वकीयांना लाभ देणे असे गंभीर आरोप आहेत..Pocra Scam Jalna: जालना जिल्ह्यातील पोकरा गैरव्यवहारात चौकशी अहवालानंतर कारवाई करू; कृषिमंत्री कोकाटे.या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी, जालना यांनी २८ जानेवारी २०२५ रोजी त्रिसदस्यीय तपासणी समिती नेमली. या समितीने सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला, ज्यामध्ये अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अनेक ग्राममहसूल अधिकाऱ्यांसह तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांच्या लॉगिन आयडीचा गैरवापर करून हा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले..आरोपींची यादीया घोटाळ्यात अंबड तहसील कार्यालयातील १९ आणि घनसावंगी तहसील कार्यालयातील ३ ग्राममहसूल अधिकारी तसेच इतर ६ कर्मचारी दोषी आढळले आहेत. यामध्ये गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल गाडेकर, बाळू सानप, पवनसिंग सुलाने, शिवाजी ढालके, कल्याणसिंग बमनावत, सुनिल सोरमारे, मोहित गोषिक, चंद्रकांत खिल्लारे, रामेश्वर जाधव, डिगंबर कुरेवाड,.Jalna Rain : जालना जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक.किरण जाधव, रमेश कांबळे, सुकन्या गवते, कृष्णा मुजगुले, विजय जोगदंड, निवास जाधव, विनोद ठाकरे, प्रविन शिनगारे, बप्पासाहेब भुसारे आणि सुरज बिक्कड यांचा समावेश आहे. याशिवाय, तहसील कार्यालयातील कर्मचारी निलेश इंचेकर (मयत), सुशिल जाधव, वैभव आडगांवकर, विजय भांडवले, रामेश्वर बारहाते, आशिष पैठणकर आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील दिनेश बेराड यांच्यावरही संगनमताने हा अपहार केल्याचा आरोप आहे..गैरप्रकार आणि पुरावे नष्टया घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचेही प्रयत्न झाले. अंबड आणि घनसावंगी तहसील कार्यालयातील संगणकांमधील डेटा फेरफार करणे, कागदपत्रे नष्ट करणे आणि शासकीय ई-मेल आयडीचा गैरवापर करून महत्त्वाचे पुरावे नष्ट केले गेले. यामुळे चौकशीला अडथळा निर्माण झाला, परंतु त्रिसदस्यीय समितीच्या तपासात तथ्य आढळून आल्याने फौजदारी कारवाईसाठी पावले उचलली जात आहेत..विलास कोमटवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून, लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.